पुणे शहर

वाघोलीत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; ‘९ सेन्सेस स्पा’वर पोलिसांचा छापा, ५ महिलांची सुटका, स्पा मॅनेजर जेरबंद, मालक फरार!

पुणे : पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेतील अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंधक कक्षाने (AHTU) वाघोली परिसरात सुरू असलेल्या सेक्स रॅकेटवर धाडसी छापा टाकला आहे. मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या या वेश्याव्यवसायातून पाच पीडित मुलींची यशस्वी सुटका करण्यात आली असून, एका पुरुष आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती की, वाघोली येथील बकोरी फाटा, रेम्बो क्रॉसेस बिल्डिंगमधील पहिल्या मजल्यावरील शॉप नं. १०६ मधील “९ सेन्सेस स्पा” येथे महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात आहे. या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक छमन कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तात्काळ खातरजमा केली. तिथे एक बनावट ग्राहक (डिकॉय कस्टमर) पाठवून खात्री पटताच पोलिसांनी अचानक छापा टाकला आणि पाच मुलींची सुटका केली.

या कारवाईत पोलिसांनी महावीर सुदाम ससाने (वय २९ वर्षे, रा. ए/ओ साबळे, साईनाथनगर, पेरणे फाटा, ता. हवेली, जि. पुणे) या पुरुष आरोपीला अटक केली आहे. आरोपीविरुद्ध वाघोली पोलिस स्टेशन येथे गु.र.नं ३४१/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १४३, (१)(३), ३ (५) आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा १९५६ चे कलम ३, ४, ५ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

ही धडक कारवाई पुणे शहराचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सह-पोलिस आयुक्त संजय दराडे, अप्पर पोलिस आयुक्त (गुन्हे) तेजस्वीनी सातपुते, आणि पोलिस उप-आयुक्त (गुन्हे) गौहर हसन, सहाय्यक पोलिस आयुक्त (गुन्हे-४) विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक छमन कापसे पोलिस अंमलदार भिवरकर, आंधळे, केदार, जाधव, रसाळ, कोंडे

महिला पोलिस अंमलदार कंक, खेडेकर अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंधक कक्ष गुन्हे शाखा, पुणे शहर यांच्या पथकाने केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page