राष्ट्रीय

सप्टेंबरमध्ये परदेशी गुंतवणूकदारांची मोठी पाठ; भारतीय बाजारातून ३५,८६१ कोटी बाहेर!

मुंबई : जागतिक पातळीवरील अस्थिरता, अमेरिकेतील रोखे परताव्यातील वाढ, भडकलेले कच्च्या तेलाचे भाव आणि तीव्र भू-राजकीय तणावामुळे सप्टेंबर महिन्यात परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी) भारतीय शेअर बाजारातून अक्षरशः काढता पाय घेतला आहे. जुलै आणि ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात भरघोस गुंतवणूक करणाऱ्या या परदेशी मंडळींनी, सप्टेंबरमध्ये भारतीय समभागांतून तब्बल ३५,८६१ कोटी रुपयांची विक्रमी माघार घेतली आहे.

दुय्यम बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांनी तब्बल ४५,५३७ कोटी रुपयांचे समभाग विकून पैसा बाहेर काढला; मात्र प्राथमिक बाजारातील (आयपीओ) ९,६७६ कोटींच्या गुंतवणुकीमुळे निव्वळ माघारीचा आकडा काहीसा सीमित राहिला. तसेच कर्जरोख्यांच्या बाजारातूनही मोठ्या प्रमाणावर पैसा परत घेतला गेला. या मोठ्या विक्रीच्या रगाड्यामुळे सप्टेंबर महिन्यात मुख्य ‘निफ्टी’ निर्देशांकात सुमारे ६.१ टक्के, तर ‘सेन्सेक्स’मध्ये ५.८ टक्के मोठी घसरण नोंदवली गेली. सलग दुसऱ्या महिन्यात प्रमुख निर्देशांक लाल रंगात बंद झाल्याने बाजारातील चिंता वाढली असून, आगामी काळातील बाजाराची दिशा पूर्णपणे जागतिक आर्थिक संकेतांवर आणि अमेरिकेच्या व्याजदर धोरणावर अवलंबून असणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page