पुणे शहरराजकारणसामाजिक

शरद पवार माझे ‘मेंटाॅर’, गौतम अदानी यांचे विधान, बारामतीत ‘एआय’ सेंटरचे उद्घाटन

बारामती : उद्योजक गौतम अदानी हे भारतातील उद्योग विश्वातले एक अग्रगण्य नाव आहे. दुसरीकडे महाराष्ट्र तसेच भारताच्या राजकारणात शरद पवार यांचाही मोठा दबदबा आहे. गौतम अदानी यांच्या उद्योगांमुळे आज लाखो हातांना काम मिळते तर शरद पवार यांच्या धोरणामुळे महाराष्ट्र तसेच भारतात अनेक आमूलाग्र बदल झालेले आहेत. दरम्यान, हे दोन्ही दिग्गज रविवारी एकाच मंचावर दिसून आले. बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठानच्या ‘शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ या अत्याधुनिक एआय सेंटरच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात गौतम अदानी आणि शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकत्र आले होते. यावेळी गौतम अदानी यांनी शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. शरद पवार माझे मेंटॉर आहेत असं मोठं विधान गौतम अदानी यांनी केलं आहे.

बारामतीत उभारलेल्या एआय सेंटरच्या उद्घाटनाप्रसंगी गौतम अदानी यांनी भाषण केले. या भाषणादरम्यान त्यांनी शरद पवार यांच्या कामाचे कौतुक केले. ‘एआय सेंटरच्या उद्घाटनाचा आमच्यासाठी खरोखरच ऐतिहासिक क्षण आहे. जगात अशी काही ठिकाणे असतात जी केवळ नकाशावरील एक बिंदू नसतात. तर प्रगती, बदल आणि संधींचे शक्तिकेंद्र म्हणून ही ठिकाणे ओळखली जातात. बारामती हे अशाच एका परिवर्तनाचे, अमर्याद शक्यता असलेले प्रतीक आहे, असे गौतम अदानी म्हणाले.

देशातील २३ राज्यात अदानी ग्रुपचा व्यवसाय आहे. त्यांनी लाखो हाताना काम दिले आहे, असेही शरद पवार म्हणाले. तसेच आणखी लाखो मुलांना काम करण्याचा अधिकार मिळेल असा विश्वासही यावेळी त्यांनी बोलून दाखवला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page