नवी दिल्ली

मोठी बातमी: पेपरफुटीच्या धास्तीने ‘नीट’ (NEET-UG) परीक्षा रद्द; NTA चा मोठा निर्णय

नवी दिल्ली : देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांमधील प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी NEET-UG (पदवीपूर्व वैद्यकीय प्रवेश परीक्षा) अखेर रद्द करण्यात आली आहे. ३ मे रोजी झालेली ही परीक्षा रद्द करण्याचा धाडसी निर्णय राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (NTA) काल जाहीर केला. या निर्णयामुळे शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

परीक्षा होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका फुटल्याच्या (Paper Leak) तक्रारी आणि संशय विविध स्तरांतून व्यक्त केला जात होता. परीक्षेची विश्वासार्हता आणि विद्यार्थ्यांच्या कष्टाचे मोल राखण्यासाठी हा निर्णय घेणे अनिवार्य असल्याचे ‘NTA’ ने स्पष्ट केले आहे.

संस्थेने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “परीक्षेतील पारदर्शकता आणि पावित्र्य जपण्यासाठी आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही, म्हणून ही परीक्षा रद्द करण्यात येत आहे.

३ मे रोजी झालेल्या परीक्षेत लाखो विद्यार्थी सहभागी झाले होते. मात्र, आता ही परीक्षा रद्द झाल्यामुळे या विद्यार्थ्यांच्या निकालाची प्रतीक्षा संपली असून त्यांना पुन्हा एकदा परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे.

विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम

प्रश्नपत्रिका फुटल्याच्या बातम्या आल्यापासूनच विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. आता परीक्षा अधिकृतपणे रद्द झाल्यामुळे अनेकांनी निर्णयाचे स्वागत केले आहे, तर काहींनी वर्षभराच्या मेहनतीवर पाणी फेरले गेल्याची भावना व्यक्त केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, यामध्ये दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेतही प्रशासनाने दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page