महाराष्ट्र
जेजुरी मार्ग अपघात: वारकऱ्यांच्या निधनाने हळहळ; उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतली जखमींची भेट

सासवड-जेजुरी मार्गावर आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात तीन वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची दखल घेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी जेजुरी ग्रामीण रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली आणि त्यांना धीर दिला. राज्य शासनाकडून मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली असून, जखमींच्या मोफत उपचाराचा खर्च शासन करणार आहे.



