नाना पेठेतील दुकानाचे शटर उचकटून चोरी करणारे ४ तासात गजाआड
समर्थ पोलिसांची कारवाई

पुणे : संत कबीर चौकाजवळ मौजमजेसाठी दुकानाचे शटर उचकटून घरफोडी करणारे चोरटे ४ तासात जेरबंद करण्यात आले. समर्थ पोलीस स्टेशनच्या पथकाने ही कामगिरी केली
१) सुजल राजन परदेशी (वय-२० ) २) सुभाष राजेश सरोज (वय-२१) ३) नितीन दिलीप सरोज (वय-२२) ४) रोहीत मुन्नालाल सरोज ( वय-२२ वर्षे सर्व राहणार शिवाजी स्टेडीअम समोर २१७ मंगळवार पेठ) अशी आरोपींची नावे आहेत.
शार्प कलर दुकान, ५०६/५०७ एच. एस. कादरी टॉवर, मॉर्डन हॉस्पिटल समोर, नाना पेठ या पत्त्यावरील दुकानाचे शटर कोणीतरी उचकटून, शटरला लावलेले कुलूप तोडून दुकानात टेबलच्या ड्राव्हरमध्ये ठेवलेले १५,५०० रुपये चोरुन नेले होते. समर्थ पोलीस स्टेशन येथे गु.र.नं १५०/२०२५ भा.न्या.सं.क.३०५ (अ), ३३१(३), ३३१ (४) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
पोलीस अंमलदार अमोल गावडे, इम्रान शेख यांनी घटनास्थळी तसेच आजुबाजुचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासणी केले. त्यांना मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने चोरी करणाऱ्या अज्ञात चोरट्यांचा शोध घेवून शिताफीने पकडण्यात आले. आरोपींनी मौजमजेसाठी दि. ५ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास शार्प कलर दुकानात चोरी केली होती.
ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर राजेश बनसोडे, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-१, ऋषिकेश रावले, सहाय्यक पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग अनुजा देशमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते, पोलीस निरीक्षक (गुन्हे) चेतन मोरे यांच्या मार्गदर्शनानुसार तपास पथकाने केली .
पोलीस उपनिरीक्षक जालिंदर फडतरे, पोलीस अंमलदार पागार, इम्रान शेख, औचरे, शिवा कांबळे, अमोल गावडे, शरद घोरपडे, भाग्येश, यादव यांनी सहभाग घेतला.



