पुणे शहरसामाजिक

ऑटोरिक्षात दीड लाख, लॅपटॉप असलेली सॅक विसरलेल्या महिलेस खडक पोलिसांचा दिलासा

पुणे : मुलीच्या शस्त्रक्रियेसाठी कर्जाऊ घेतलेले दीड लाख रुपये आणि लॅपटॉप असलेली सॅक रिक्षात विसरलेल्या महिलेची बॅग तब्बल ७० सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासून रिक्षाचा क्रमांक खडक पोलिसांनी मिळवला. मंगळवार पेठ येथून ऑटोरिक्षा चालकासह ताब्यात घेतली.

रिक्षातील लॅपटॉप व दीड लाख रोख रक्कम असलेली सॅक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील माने यांच्या हस्ते महिलेच्या स्वाधीन करण्यात आली. हवालदिल झालेल्या महिलेवर ओढवलेला प्रसंग बघून पोलिसांनी परिश्रम पूर्वक तिला दिलासा मिळवून दिला.

एलिझाबेथ रवी (वय ४५, राहणार भवानी पेठ) असे महिलेचे नाव आहे. १२ तारखेला त्यांच्या मुलीला जहांगीर हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले होते. तेथून रिक्षाने घरी येत असताना त्यांची सॅक रिक्षात गहाळ झाली. गस्ती वरील दक्षता पथकातील अंमलदारांना महिलेने घडलेला प्रकार सांगितला. विशेष म्हणजे मुलीच्या शस्त्रक्रिये साठी त्यांनी कर्ज घेतले होते. तीच रक्कम रिक्षात विसरल्याने त्या तणाव ग्रस्त होत्या. सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव यांच्या सूचनेनुसार तपास पथकातील तळेकर, चव्हाण, वाबळे, कुडले व इतर सर्व कर्मचारी यांनी सुमारे ७० सीसीटीव्हींचा धांडोळा घेतला.

अचानक गहाळ झालेली मोठी रक्कम खडक पोलीसांनी परत मिळवून देताना दाखवलेली संवेदनशीलता व कौशल्य पाहून एलिझाबेथ रवी यांनी खडक व पुणे पोलिसांचे शतशः आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page