बीडसामाजिक

मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू 

बीड : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटीमध्ये आदरणीय मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसले आहेत. दुसरीकडे, समाजातील आक्रोश इतका वाढला आहे की मराठा बांधवांनी ‘समृद्धी महामार्ग’ रोखून धरला आहे.

रस्त्यावर उतरलेला हा जनसागर आणि जरांगे पाटलांचे उपोषण ही सरकारसाठी धोक्याची घंटा आहे. कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी, सरकारने कोणतीही चालढकल न करता मराठा समाजाच्या कायदेशीर आणि न्याय्य मागण्या त्वरित मंजूर करायला हव्यात. समाजाचा संयम आता संपत चालला आहे!

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण करून नये यासाठी काल आमदार प्रसाद लाड, उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांची भेट घेतली यावेळी चर्चेदरम्यान..

अधिकारी ऐकत नाहीत, मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतो, हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीत आमच्याकडून विलंब झाला

, सातारा गॅझेटिअर्सचा जीआर काढला तर कोर्टात चॅलेंज होऊ शकतो म्हणून जीआर काढला नाही, असे मुद्दे मराठा उपसमितीचे उपाध्यक्ष विखे पाटील यांनी मांडले. यावरून निर्णय घेण्यास विखे पाटील असमर्थ असल्याचे दिसले. त्यामुळे मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम राहिले. आजपासून ते आंतरवाली येथे भर उन्हात उपोषण करणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page