नवी दिल्लीपुणे शहरराष्ट्रीय

दिल्ली हायकोर्टाने बडतर्फ IAS पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, कोणत्याही क्षणी अटक होणार

बनावट अपंगत्व प्रमाणपत्राचा वापर करून पूजा खेडकरने यूपीएससीमध्ये निवडीसाठी विशेष सवलत मिळवली, असे अनेक आरोप पूजा खेडकरवर करण्यात आले होते.

नवी दिल्ली प्रतिनिधी : प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे.  बनावट अपंगत्व प्रमाणपत्राचा वापर करून पूजा खेडकरने  यूपीएससीमध्ये निवडीसाठी विशेष सवलत मिळवली. असे अनेक आरोप पूजा खेडकरवर करण्यात आले होते. दरम्यान या प्रकरणात पूजा खेडकरने दिल्ली हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली होती. दरम्यान यावर आज सुनावणी पार पडली.

दिल्ली हायकोर्टाने बनावट आयएएस अधिकारी पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला आहे. त्यामुळे पूजा खेडकरला मोठा धक्का मानला जात आहे. आता कोणत्याही क्षणी पूजा खेडकरला अटक होण्याची शक्यता आहे. कोर्टाने पूजा खेडकरला अटकेपासून संरक्षण दिले होते. ते संरक्षण देखील हायकोर्टाने आता काढून घेतली आहे. हे प्रकरण केवळ यूपीएससीची नव्हे तर समजायची फसवणूक करणारे आहे असे कोर्टाने म्हटल्याचे समजते आहे.

दिल्ली पोलिसांनी ४ सप्टेंबर रोजी पूजा खेडकर प्रकरणात दिल्ली हायकोर्टात अहवाल सादर केला. निलंबित प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरने दोन अपंगत्व प्रमाणपत्र सादर केली होती. त्यापैकी एक बनावट असल्याचा पोलिसांना संशय आहे. दरम्यान ३१ जुलै रोजी यूपीएससीने पूजा खेडकरची निवड रद्द केली होती. त्यानंतर तिला भविष्यात कोणतीही परीक्षा देण्यास बंदी घातली होती. आयोगाने पूजा खेडकरविरुद्ध दिल्ली पोलिसांकडे देखील गुन्हा दाखल केला होता.

या प्रकरणात यूपीएससीला माझ्यावर कारवाई करण्याचा अधिकार नसल्याचा दावा पूजा खेडकरने दिल्ली हायकोर्टमध्ये केला होता.  २०१९, २०२१, २०२२ मध्ये व्यक्तिमत्व चाचणीवेळी गोळा केलेल्या बायोमेट्रिक डेटाद्वारे माझी ओळख व्हेरिफाय केली आहे. आयोगाने माझ्या सर्व कागदपत्रांची पडताळणी केलेली आहे. त्यामुळे आयोगाला माझ्यावर कारवाई करण्याचा अधिकार नसल्याचे पूजा खेडकरचे म्हणणे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page