शैक्षणिक
मुंबई विद्यापाठाचा इशारा! एबीसी आयडीचा तपशील सादर न केल्यास कारवाई

मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत अंमलात आणण्यात आलेल्या एकेडमिक बँक ऑफ क्रेडिट (एबीसी) प्रणालीची अंमलबजावणी सक्तीची करण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठाशी संलग्न सर्व महाविद्यालये, मान्यताप्राप्त संस्था तसेच स्वायत्त महाविद्यालयांनी प्रत्येक विद्यार्थ्याचे एबीसी आयडी तयार करून ते संबंधित ई-समर्थ प्रणालीशी संलग्न करणे बंधनकारक आहे. १५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत महाविद्यालयांतील प्रत्येक विद्यार्थ्यांच्या एबीसी आयडीचा तपशील विद्यापीठाकडे सादर करणे बंधनकारक आहे. याची अंमलबजावणी न केल्यास विद्यापीठ कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे विद्यापीठाकडून सक्त निर्देश देण्यात आले आहेत.



