मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या १७१ वाहनचालकांवर कारवाई

पुणे शहर वाहतूक विभागाकडून मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या चालकांविरुद्ध २४ ते २६ एप्रिल दरम्यान ३ दिवस विशेष मोहीम राबविण्यात आली. १७१ वाहनचालकांवर मद्यपान करून वाहन चालविल्याबद्दल कायदेशीर कारवाई करण्यात आली.
शहरातील विविध भागांमध्ये एकूण ३३ नाकाबंदी पॉईंट उभारून
ब्रेथ अनालायझरद्वारे तपासणी करण्यात आली. तसेच वाहतुकीचे उल्लंघन करणाऱ्या इतर चालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई, पुढील कायदेशीर प्रक्रिया करण्यात आली.
अपघात प्रतिबंध, रस्ते सुरक्षितता वाढविणे,
नागरिकांचे प्राण व मालमत्ता संरक्षण,
शिस्तबद्ध व जबाबदार वाहन संस्कृती निर्माण करणे हा या मोहिमेचा हेतू आहे. मद्यप्राशन करून वाहन चालवणे हे गंभीर व दंडनीय आहे. यामुळे अपघातांचा धोका लक्षणीय वाढतो. सर्व नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून स्वतःचा व इतरांचा जीव सुरक्षित ठेवावा, असे आवाहन
पुणे शहर वाहतूक विभागाने केले आहे.



