गुन्हेगारीसातारा

डोक्यात दगड घालून खून केल्याचा गुन्हा १२ तासात उघड

सातारा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

सातारा : रोहित उर्फ विकास उर्फ विकी शांताराम सावंत (वय ३० वर्षे ) याचा कोणीतरी खटाव (ता. खटाव) गावच्या हद्दीत आंबेडकरनगर मध्ये डोक्यात दगड घालून त्याचा खून केला होता. २३ एप्रिल रोजी रात्री अकरा नंतर ही घटना घडली होती. १२ तासात या खुनाचा गुन्हा उघडकीस आणला गेला.

स्थानिक गुन्हे शाखा सातारा व पुसेगाव पोलीस ठाण्याच्या तपास पथकांनी सर्वप्रथम घटनास्थळाची पाहणी केली. खून झालेल्या व्यक्तीचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याची माहिती प्राप्त झाली. त्या महिलेचे आंबेडकर नगर खटाव येथील आणखी एका व्यक्तीशी अनैतिक संबंध असल्याचे देखील समजले. तपास पथकांनी संशयित व्यक्तीस ताब्यात घेवून त्याच्याकडे कौशल्यपूर्वक तपास केला‌. संबंधित महिलेशी रोहित सावंत याचे अनैतिक संबंध असल्याचा राग मनात धरुन तो झोपला असताना डोक्यात दगड घालून खून केला असल्याचे सांगितल्याने त्याला अटक करण्यात आली. १२ तासात खुनाचा गुन्हा उघडकीस आणला गेला.

पुसेगाव पोलीस ठाणे गु.र.नं.८६/२०२४ भादंविक ३०२ प्रमाणे गुन्हा नोद केला होता.

पोलीस अधीक्षक सातारा समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी कोरेगाव उपविभाग सोनाली कदम, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अरुण देवकर सातारा, सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट दिली.

अरुण देवकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताठे व पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिगाडे यांचे अधिपत्याखाली तपास पथक तयार केले.

पुसेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर येवले, पोलीस अंमलदार सुधीर बनकर, मंगेश महाडीक, सचिन साळुंखे, सनी आवटे, मनोज जाधव, प्रविण कांबळे, अमित माने, राजू कांबळे, केतन शिंदे, वैभव सावंत, शिवाजी गुरव तसेच अंमलदार सुधाकर भोसले, चंद्रहार खाडे, सुभाष शिंदे, धनंजय शिंदे, योगेश चागल, गितांजली काटकर, सुनिल अबदागिरे, अशोक सरक, प्रमोद कदम, शंकर सुतार, अमोल जगदाळे, अविनाश घाडगे, अश्विनी नलवडे, कविता बरकडे, यांनी कारवाईत‌ सहभाग घेतला.‌

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page