पुणे शहरमहाराष्ट्र

“पुण्यात पिंडाला कावळ्या ऐवजी कबुतर शिवतंय” एरंडवणे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून अनोखे आंदोलन

पुण्यातील नागरिकांच्या आरोग्यासाठी मंडळाच्या वतीने हा खरोखरच स्तुत्य उपक्रम राबिविण्यात आला

पुणे प्रतिनिधी : पुणे तिथे काय उणे.. अशाच एका पुण्यातील आंदोलनाची चर्चा शहरात आहे. पुण्यात पिंडाला कावळ्या ऐवजी अगोदर कबुतर शिवतंय म्हणून एरंडवणे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने एक अनोखे आंदोलन केलं. एरंडवणे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने बाबा भिडे पुलाच्या पुढे नदीपात्राच्या रस्त्यावरती श्री अष्टभुजा दुर्गामाता मंदिरासमोर कबूतरांचा (पारवे) थवा रोज येत असतो. त्या ठिकाणी जे नागरिक येऊन कबुतरांना खाण्यासाठी अन्न/धान्य टाकतात. त्या पक्षीप्रेमींना मंडळाच्या वतीने पुणेकरांच्या आरोग्यासाठी हात जोडून विनंती करण्याचा उपक्रम करण्यात आला.

यावेळी येथे आलेल्या काही पक्षीप्रेमींना आम्ही हात जोडून विनंती केली व यापुढे कबुतरांना पुणेकरांच्या आरोग्यासाठी खाण्यासाठी अन्न टाकणार नाही अशी प्रतिज्ञा त्यांच्याकडून घेण्यात आली. त्यावेळी त्यांना आम्ही पुण्यातील दशक्रिया कार्यक्रमाला पिंड ठेवतो त्या पिंडाला आता सर्वप्रथम कबूतर शिवते व नंतर कावळा शिवतो अशी परिस्थिती सध्या पुणे शहरातील आहे असे सांगण्यात आले. या कबुतरांच्या विष्ठेमुळे घातक प्रकारचे विषाणू पसरत असून यामुळे अनेकांना श्वसनाचे आजार उद्भवले आहेत. महापालिकेने कबुतरांना सार्वजनिक ठिकाणी अन्न खायला घालण्यास बंदी आणली असून यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.  यावेळी बोलताना मंडळाचे अध्यक्ष प्रशांत वेलणकर यांनी नदीपात्रामध्ये असलेल्या कबुतरांच्या तीन ठिकाणी पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने तात्काळ कबुतरांना अन्न न घालण्याचा व दंडात्मक कारवाईचा इशारा देणारा फलक लावावा अशी मागणी केली आहे.

ज्या ठिकाणी कबूतरांना अन्न/धान्य टाकले जाते त्याच्या आसपासच्या परिसरातील नागरीकांना श्वसनाचा त्रास होतो. शिवाय कबूतरांच्या विष्ठेतील घातक विषाणुंमुळे फुप्फूसांचा आजार होण्याची शक्यता देखील असते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यासाठी मंडळाच्या वतीने घेण्यात आलेला हा उपक्रम खरोखरच स्तुत्य असल्याचे पुणेकरांचे म्हणणे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page