पुणे शहरमहाराष्ट्रसामाजिक

खराडीत बंधाऱ्यावर पुरात अडकलेल्या व्यक्तीची मानवी साखळी करुन केली सुटका

पोलिसांच्या मानवतावादी कार्याचे सर्वत्र कौतुक

पुणे : खराडीहून केशवनगर कडे जाणाऱ्या नदीवरील बंधाऱ्यावरील पुलावर एक मोटारसायकलस्वार पुराच्या पाण्यात अडकून पडला होता. त्याचे जिवीत धोक्यात आले होते.

खराडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण व सहकाऱ्यांनी तातडीने हालचाली करुन दोरीच्या साह्याने मानवी साखळी बनवून पीडिताला सुखरूप पाण्यातून बाहेर आणले. एक जीव वाचविण्यासाठी पोलिसांनी केलेल्या धडपडीचे खराडी व पंचक्रोशीत कौतुक होत आहे.

गुरुवारी रोजी मुळा मुठा नदीवरील पाण्याचा विसर्ग वाढणार असल्याची माहिती खराडी पोलीस ठाण्यास मिळाली. सहाय्यक पोलीस निरिक्षक खांडेकर व पथक असे खराडीहून केशवनगर कडे जाणाऱ्या मुळा मुठा नदीवरील बंधाऱ्यावरील पुलावरील रस्ता बंद करण्यासाठी गेले. एक व्यक्ती मोटरसायकलसह बंधाऱ्यावर मध्यभागी अडकल्याचे दिसून आले. त्याला वाचवण्यासाठी फायर ब्रिगेडला तात्काळ कळविले. त्याचवेळी पाण्याचा प्रवाह वाढत होता. मोटरसायकलस्वार पाण्यात वाहून जाण्याची भिती होती. त्यामुळे खांडेकर ,पोलीस अंमलदार दोरगे, हवालदार सय्यद,अंमलदार गायकवाड, अंमलदार कोद्रे ,महिला पोलीस अंमलदार थोरात तसेच मालवंडे, महानवर, पोलीस अंमलदार साळके, काळे यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दोरीच्या साह्याने मानवी साखळी बनवली. त्या संकटग्रस्तास सुरक्षितरित्या बाहेर काढले. त्याचे प्राण वाचवण्यात यश आले. नवाज खुर्शीद कोतवाल (वय ३८ वर्ष रा. तुकाराम नगर, चंदन नगर) असे त्याचे नाव आहे. सदरचा धोकादायक रस्ता बॅरिकेट लावून पूर्णपणे बंद करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page