आंतरराष्ट्रीयसामाजिक

म्यानमारच्या सागाइंग भागातील मठावर हवाई हल्ला

सागाइंग : म्यानमारच्या सागाइंग भागातील एका मठावर लष्कराकडून हवाई हल्ला करण्यात आला. यात कमीत कमी २३ लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये ४ लहान बालकांचाही समावेश आहे. हा हल्ला लिं ता लू गावात झाला. हे ठिकाण मंडाले शहरापासून ३५ किलोमीटर अंतरावर आहे, जे लष्करविरोधी कारवायांचा बालेकिल्ला मानले जाते.

म्यानमारमध्ये सध्या लष्कराची राजवट आहे. फेब्रुवारी २०२१ मध्ये आंग सान सू की यांच्या लोकशाही सरकारला हटवून लष्कराने सत्ता हातात घेतली होती. त्यामुळे देशात लोकशाही समर्थक आणि लष्कर समर्थक यांच्यात संघर्ष सुरु आहे. खासकरून सागाईंगमध्ये सामान्य नागरिक आणि स्थानिक मिलिशिया गटांनी लष्कराविरुद्ध युद्ध पुकारले आहे. त्यामुळे लष्कराकडून अशा गटांवर हल्ले करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून मठावर हल्ला करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.

यावेळी मठात १५० पेक्षा जास्त लोक लष्करी कारवायांपासून वाचण्यासाठी लपले होते, मात्र त्याचवेळी सैन्याने हल्ला केला. ज्यामुळे मठासह आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. या हल्ल्यात ४ लहान मुलांसह २३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तसेच ३० लोक गंभीर जखमी झाले आहेत, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page