दिवाळी-धनत्रयोदशी आधीच सोन्याने गाठला उच्चांक

पुणे : दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या आधीच सोन्याच्या दराने उच्चांक गाठला आहे. आज ६ ऑक्टोबर रोजी २४ कॅरेट सोन्याचा दर १ हजारांनी वाढला आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावरच सोने महागल्याने ग्राहकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. २४ कॅरेटबरोबरच २२ आणि १८ कॅरेट सोन्याच्या किंमतीतही तेजी पाहायला मिळतेय. तुम्हीदेखील आज सोनं खरेदी करण्याचा विचार करताय? तर आजचे भाव जाणून घ्या.
२४ कॅरेट सोन्याच्या दरात १,३७० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळं प्रतितोळा सोनं १,२०,७७० रुपयांवर स्थिरावले आहे. त्याचबरोबर २२ कॅरेट सोन्याच्या दरात १,२५० रुपयांची वाढ झाली असून १,१०,७०० रुपयांवर स्थिरावले आहे. तसंच, १८ कॅरेट सोन्याच्या दरात १,०३० रुपयांची वाढ झाली आहे त्यामुळं प्रतितोळा सोने ९०,५८० रुपयांवर स्थिरावले आहे.
दस-याच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरात किंचितशी घसरण झाली होती. मात्र आता दिवाळीला अवघे काही दिवस बाकी असताना पुन्हा एकदा सोनं वधारलं आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींचा परिणाम सोन्याच्या दरांवर होताना दिसतो आहे.



