गुन्हेगारीपिंपरी-चिंचवडपुणे शहरसामाजिक

स्पा’च्या नावाखाली ५ महिलांना वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त करणाऱ्यांवर कारवाई 

पुणे : ज्युवेनेक्स स्पा ब्युटी ऍण्ड वेलनेस (रॉयल हेरीटेज मॉल, पहिला मजला, एन.आय.बी.एम रोड, कोंढवा) या ठिकाणी मसाज सेंटर (स्पा) च्या नावाखाली ५ महिलांना वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त करणाऱ्या  निशा (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून स्पा मॅनेजर अन्थोनी विल्सन स्वामी (वय ३९ वर्षे,  फ्लॅट नं ८०१, शहदाब टॉवर, चुडामन तालीम समोर, भवानी पेठ) यास अटक करण्यात आली आहे.

सुटका करण्यात आलेल्या महिला थेरपिस्ट म्हणून काम करत होत्या. हसमंग कॉलनी, वाखासदर, वाखा नागालैंड, टिहरी गढ़वाल, गंगाखेड नाका, जि. परभणी, पानमळा, ताडीवाला रोड,पाटस, कुसेगाव, ता. दौंड,  केशवनगर, मुंढवा येथील आहेत.

आरोपींविरुध्द अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा १९५६ चे कलम ३, ४, ५ व भा.न्या.स.१४३, ३(५) प्रमाणे कायदेशीर फिर्याद दिल्याने वरील प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. काळेपडळ पोलीस स्टेशनचे पोलीस तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page