पिंपरी-चिंचवडपुणे शहरराजकारण
महाराष्ट्रामध्ये आम आदमी पार्टी स्वतंत्रपणे सर्व पालिका निवडणुका लढवणार

पुणे : आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या निर्देशाप्रमाणे आम आदमी पार्टी महाराष्ट्र मधील पालिका निवडणुका या कुणाशीही युती न करता, स्वतंत्रपणे स्वबळावर आणि सक्षमपणे लढवणार आहे, असे आपचे राज्य कार्याध्यक्ष अजित फाटके पाटील यांनी स्पष्ट केले आहे. आम आदमी पार्टी प्रवक्ता मुकुंद किर्दत यांनी सांगितले की युती, आघाडी संदर्भात माध्यमांमध्ये येत असणाऱ्या बातम्या या दिशाभूल करणाऱ्या आहेत. काही माध्यमांतून काॅंग्रेस पक्ष आम आदमी पार्टी किंवा वंचित बहुजन आघाडीच्या सोबत आघाडी करणार असल्याचे प्रसिद्ध झाले आहे. त्यासंदर्भात हा खुलासा करण्यात आला आहे.



