महाराष्ट्रराजकारण

राज्यात पुन्हा राजकीय भूकंप : अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी केलेल्या राजकीय भूकंपाला एक वर्ष होत नाही तोच आता राज्यात अजून एक भूकंप होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अजित पवार शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अजित पवार हे गेल्या काही दिवसांपासून पक्षांमध्ये नाराज असल्याच्या चर्चा आहेत. नुकत्याच झालेल्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात त्यांनी आपली नाराजी स्पष्टपणे नमूद केली होती. यातच त्याचा राजभवनावर दाखल झाल्याने अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील का ? असा प्रश्न उभा राहिला आहे.

याबाबत अजून कोणतीही ठोस माहिती मिळाली नसली तरी देखील अजित पवार हे आपल्या पी ए सह राजभवनामध्ये दाखल झाले आहेत. अशावेळी ते उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील अशा प्रकारचे वृत्त समोर येत आहे.

याचबरोबर अजित पवार ते आपल्या विरोधी पक्षनेत्याचा राजीनामा देणार आहेत व त्यानंतर ते उपमुख्यमंत्री पदाचे शपथ घेतील व त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नऊ आमदार मंत्रीपद घेतील असे म्हटले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page