गुन्हेगारीपुणे शहर

नव्याने समाविष्ट झालेल्या खांदवे नगर भागात बेकायदेशीर दारु विक्रीवर खराडी पोलिसांकडून त्वरित कारवाई

पुणे : लोहगावच्या खांदवे नगर मध्ये म्हशीचा गोठा व हिराई बिल्डींगच्या मधोमध असलेल्या मोकळ्या जागेतील पत्र्याचे शेडखाली बेकायदेशीरपणे दारुचा अड्डा चालवला जात होता. खराडी पोलिसांनी या ठिकाणी छापा घालून हा अड्डा उध्वस्त करत दोघांना अटक केली.

पूर्वी विमानतळ ठाण्याच्या हद्दीत हा अड्डा असताना विमानतळ पोलिसांना इथे काही मिळून येत नव्हते, याचे नवल नागरिकांना वाटत आहे. ‘महाराष्ट्र मिशन’ च्या बातमीची दखल पोलीस महासंचालक कार्यालयाने घेऊन कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर खराडी पोलिसांनी त्वरित कारवाई केली.

हौशीराम दगडु गावडे (वय-६० वर्षे, हिराई बिल्डिंग शेजारी, स.नं.१२१, खांदवे नगर, लोहगाव) प्रदिप एकनाथ गड्डमवाड (वय ३६ वर्षे, रा. काळु शेजवळ यांची चाळ गल्ली ७ शेजवळ पार्क, खांदवे नगर लोहगाव, मुळ रा-गांव पेठ वडज, ता-कर जि.नांदेड) यांना अटक करण्यात आली.

२८३० रुपये किंमतीच्या दारुच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. दारुबंदी अधिनियम कलम ६५ (ई) प्रमाणे सरकार तर्फे कायदेशीर फिर्याद देण्यात आली.

विमानतळ पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रामध्ये येणाऱ्या शाळेजवळ दारू विक्री बाबत ‘महाराष्ट्र मिशन’ ने बातमी प्रकाशित केली होती. परंतु आता सदर कार्यक्षेत्र हे विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत नसून हे खराडी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रामध्ये नव्याने समाविष्ट झाले आहे. त्यानंतर खराडी पोलिसांनी तत्परता दाखवत सदर दारू अड्डयावर कारवाई केली.

‘खांदवे नगरच्या कवडे वस्ती मध्ये ग्लोबल इंग्लिश स्कूल नावाच्या शाळेला लागूनच अनेक महिन्यांपासून दिवसरात्र अवैधपणे दारूचा धंदा सुरू आहे. पत्र्याच्या शेडचे रूपांतर जणू परमिट रुम मध्ये झाले आहे. पोलिसांचे तेथे कोणतेही नियंत्रण नाही. गुटखा विक्री होत असल्यास पोलीस नियंत्रण कक्षाला कळविण्याचे आवाहन करणारे पोलीस गुटख्यापेक्षा हजार पट घातक असलेल्या अवैध दारू धंद्याकडे दुर्लक्ष करत असल्याने संताप आणि असाह्यता व्यक्त होत आहे. उत्पादन शुल्क विभागालाही हे दारू धंदे दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.’ असे सदर बातमीत म्हटले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page