महाराष्ट्रमुंबईराजकारणसामाजिक

अजितदादांनी केलेला उल्लेख अन् त्यांचा विमान अपघाती मृत्यू! राऊंताच्या शंकेने राजकारणात ‘भूकंप’

मुंबई : प्रतिनिधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावर त्यांच्याच राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार अमोल मिटकरी यांनी गंभीर अन् संशय व्यक्त करणारे मुद्दे उपस्थित केले. याचा मुद्यांचा संदर्भ घेत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी, भाजपच्या घोटाळ्याची फाईल, असल्याचा अजितदादांनी केलेला उल्लेख अन् त्यांचा विमान अपघाती मृत्यू! रहस्यमय रित्या मृत्यू झालेल्या ‘जस्टीस लोया’ प्रकरणाचा दाखल देत, अजित पवार यांच्या विमानाचा अपघात की घातपात, असा प्रश्न उपस्थित करत अजितदादांच्या अपघाती निधनाचा मु्द्दा संसदेत नेणार असल्याचा इशारा दिला.

अजिप पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी, अजितदादांचा अपघात आहे की घातपात आहे, याबाबत अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. यावरून राज्याच्या राजकारणात काहूर माजलं आहे. या शंकावर शिवसेना ठाकरे सेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत म्हणाले, हे प्रकरण साधे नाही. अजित पवार मागे फिरले असते तर, भाजपची दहशत मोडून गेली असती. अजित पवार वारंवार सांगत होते की, माझ्याकडे भाजपच्या घोटाळ्याची फाईल आहे अन् मी ती उघड करेन. हे त्यांनी १५ जानेवारीला सांगितले आणि पुढील दहा दिवसात त्यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. हे रहस्यमय आहे. मला जस्टीस लोया प्रकरणाची आठवण झाली.

अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलेले प्रश्न गंभीर स्वरूपाचे आहेत, असे सांगत संजय राऊत यांनी, अजित पवार यांच्या विमान आपघातावर अनेक शंका उपस्थित केल्यात. ‘जर विमानातून सहा जण प्रवास करत होते तर, पाच मृतदेह कसे काय मिळाले? मग सहावी व्यक्ती कोण होती? त्याची बॉडी का मिळाली नाही? सगळे देह जाळून खाक झाले. त्यांची ओळख पटवता येत नव्हती. मात्र त्याचवेळी अजितदादांच्या जवळ असलेले कागद जळालेले नाहीत. दादांसोबत भाजपच्या भ्रष्टाचाराची फाईल होती का? ते मुंबईतून फाईल बारामतीत सुरक्षित ठेवायला घेऊन चालले होते का?’ असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page