पुणे शहर

पुणे पोलिसांची थेट‌ राजस्थानमध्ये धाड; अंमली पदार्थाची तस्करी करणारी आंतरराज्यीय टोळी उध्वस्त 

४ कोटी, २७ लाख किंमतीचे २ किलो मेफॅड्रॉन जप्त 

पुणे : पुणे पोलिसांनी थेट‌ राजस्थानमध्ये धाड टाकून अंमली पदार्थाची तस्करी करणारी आंतरराज्यीय टोळी उध्वस्त केली.‌ १ किलो ९६० ग्रॅम मेफॅड्रॉन जप्त करुन ४ कोटी, २७ लाख ९ हजार किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करत ६ आरोपींना अटक केली.

खराडी येथील इऑन आयटी पार्क फेज २ मागील गेट जवळ दोन जण पहाटे संशयास्पद अवस्थेत आढळून आले. एका पांढऱ्या रंगाच्या स्वीप्ट कारमधून २७ ग्रॅम एम.डी. हा अंमली पदार्थ, व तत्सम साहित्य असे १२,४१,००० रुपयांचा ऐवज त्यांच्याकडून जप्त करण्यात आला. खराडी पोलीस स्टेशन येथे कलम ८ (क), २१ (ब), २९ एनडीपीएस कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

तपासादरम्यान परिमंडळ ७ चे पोलीस उप आयुक्त सोमय मुंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन मेफॅड्रॉन या अंमली पदार्थाचे मुख्य रॅकेटचे जाळे उघड करण्याबाबत मार्गदशन करुन सुचना दिल्या होत्या. त्यानुसार खराडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांनी तपास पथकाचे अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे, पोलीस उप निरीक्षक राहुल कोळपे व तपास पथकातील स्टाफ यांची दोन तपासी पथके तयार केली. त्यांना सदर अंमली पदार्थाशी निगडीत आरोपींचा तात्काळ शोध घेवून गुन्हयाचा तपास शिघ्र गतीने करुन जास्तीत जास्त मुद्देमाल हस्तगत करण्याबाबत सुचना दिल्या.

अटक करण्यात आलेले दोन आरोपी मोतीसिंह श्रवणसिंह राजपुरोहित (वय २८ वर्षे, रा. वाघोली) व हरीष सुजनाराम देवासी, (वय २२ वर्षे, रा. वाघोली) या दोन्ही आरोपींकडे पोलीस कोठडीत कौशल्यपूर्ण तपास केला असता दोन्ही आरोपी हे जिल्हा जोधपूर (राजस्थान) येथील मुळचे रहिवासी असल्याचे निदर्शनास आले. दोघेजण एमडी व्यवसायात गेल्या वर्षभरापासून सक्रिय असून एमडी हा अंमली पदार्थ ते राजस्थान येथील साथीदारांकडून मागणी करुन अंमली पदार्थाचा पुणे परिसरात व्यवसाय करीत असल्याचे तपासात उघड झाले.

मोतीसिंह राजपुरोहित कडे केलेल्या तपासात  योगेश ऊर्फ मनीष बाबुराम बिष्णोई हा राजस्थान येथून एमडी विक्री करण्यास येणार असल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त झाली. पोलीस अंमलदार श्रीकांत शेंडे, महेश नाणेकर, सचिन पाटील, श्रीकांत कोद्रे, तांत्रिक विश्लेषक सुरज जाधव यांनी सदर इसमास ७ फेब्रुवारी रोजी वाघोली परिसरातून सापळा रचुन ताब्यात घेतले. पंचनाम्या अंतर्गत १५१ ग्रॅम मेफॅड्रॉन जप्त करण्यात आले. त्याची किंमत ३०,२०,००० होती. योगेश ऊर्फ मनीष बाबुराम बिष्णोई ( वय-३० वर्षे, रा लोडता हरीदास शोता, कल्याणीनगर, लोहावत, तहसील-चामु, जिल्हा-जोधपूर) यास या गुन्हयात अटक करण्यात आली. अधिक तपास केला असता सोबत राजस्थान येथून अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणारा त्याचा मावस भाऊ सचिन ऊर्फ एस के रमेशकुमार बिष्णोई (वय २० वर्षे रा पल्ली खिलोरीता, लोहावट, जि जोधपूर) यास तांत्रिक तपास करुन हडपसर, मुंढवा परिसरातून रात्रीच्या वेळी ताब्यात घेण्यात आले. एमडी पदार्थ विक्री करुन जवळ बाळगलेली रोख ४,६५,००० जप्त करण्यात आली.

त्याने मांजरी बुदुक येथे राहणारा अमित सुनिल घुले यास एमडी विक्री केल्याची कबुली दिल्याने तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी अमित सुनिल घुले (वय ४० वर्षे, रा वृंदावन कॉलनी, बेल्हेकर वस्ती, मांजरी) यास फॉर्च्यूनर वाहनासह शिताफीने ताब्यात घेण्यात आले. ७९,६०,००० किंमतीचे ३९८ ग्रॅम एमडी, दोन मोबाईल फोन अशी १,०२,४०,००० मालमत्ता पंचनाम्याने जप्त करुन आरोपीस अटक करण्यात आली.

तपासामध्ये पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ७, सोमय मुंडे, शहर व पोलीस उप आयुक्त (गुन्हे शाखा) निखील पिंगळे यांनी संपूर्ण गुन्हयाचा आढावा घेऊन राजस्थान येथील अंमली पदार्थाचे व्यवसायामध्ये सक्रीय असणाऱ्या टोळीचे रॅकेट उध्वस्त करण्याबाबत मार्गदर्शन केले.

तपास पथके तयार करुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांना तपासाबाबत सुचना दिल्या. त्यानुसार अंमली पदार्थ विरोधी पथक, युनिट २ प्रभारी पोलीस निरीक्षक पंडीत रेजितवाड यांच्या अधिपत्याखाली खराडी, वाघोली, विमानतळ पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक राहुल कोळपे, मनोज बागल, नितीन राठोड व पोलीस पथक व अंमली पदार्थविरोधी पथक शाखा २ चे सहायक पोलीस निरीक्षक नितीन कुमार नाईक असे ५ अधिकारी व २० अंमलदार यांची वेगवेगळी ५ तपासी पथके तयार करण्यात आली.

अधिकारी व अंमलदार राजस्थान येथे दोन आरोपींसोबत गेले. तपास करुन आरोपींची घरझडती घेतली. कौशल्यपूर्ण तपास करुन अटक आरोपींच्या संपर्कातील एमडी अंमली पदार्थ मुख्य वितरक रतनलाल किष्णाराम जाठ (वय २० वर्षे रा बलदेवनगर, बालोतरा, मुळ गांव पिरानी साई योकीढानी, परेड तहसिल गिडा, जिल्हा बालोतरा) यास दि. ११ रोजी ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून दोन कोटी शहात्तर लाख ऐंशी हजार रुपये किंमतीचा १३८४ ग्रॅम, मेफॅड्रॉन हस्तगत करण्यात आला.

अंमली पदार्थाच्या रॅकेटमध्ये सक्रिय असणारा वा फरार आरोपी रामकरण जाट ऊर्फ चौधरी ऊर्फ सियाग (रा कपोरीया ओसीया, जिल्हा जोधपूर ) यास पंडीत रेजितवाड यांनी ताब्यात घेतले आहे.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त, पुणे शहर, अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा,  अपर पोलीस आयुक्त गुन्हे पंकज देशमुख, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग मनोजकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ७ सोमय मुंडे, पोलीस उप आयुक्त गुन्हे निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त खराडी विभाग प्रांजली सोनावणे, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक खराडी पोलीस ठाणे  संजय चव्हाण, प्रभारी पोलीस निरीक्षक अंमली पदार्थविरोधी शाखा युनिट २ पंडीत रेजितवाड, खराडी तपास पथकाचे प्रभारी अधिकारी रविंद्र गोडसे, सहायक पोलीस निरीक्षक राहुल कोळपे, पोलीस उप निरीक्षक व तपास पथकातील पोलीस अंमलदार श्रीकांत शेंडे, महेश नाणेकर, सचिन पाटील, सुरेंद्र साबळे, निलम कर्पे, साहेबराव गुंडाळे, श्रीकांत कोद्रे, तांत्रिक विश्लेषक सुरज जाधव, विलास केदारी, अशोक केदार, वाघोली पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक मनोज बागल, पोलीस अंमलदार पांडुरंग माने, गहिनीनाथ बोयणे, सुनिल कुसाळकर, लोणीकंद पोलीस ठाण्याचे अमोल ढोणे, विमानतळ पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक नितीन राठोड, व पोलीस अंमलदार अंकुश जोगदंड, लालु क-हे, राहुल जोशी, तसेच अंमली पदार्थ विरोधी पथकाचे सहा पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक व पोलीस अंमलदार अमोल सोनवणे, संदीप जाधव, परिमंडळ ७ कार्यालयाचे तांत्रिक विश्लेषक प्रविण गव्हाणे यांनी केली.

https://www.instagram.com/reel/DU0v15EjFBE/?igsh=MXg5OWRieW45Z3RzZw==

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page