आंतरराष्ट्रीय

खामेनी यांच्यानंतर त्यांच्या पत्नीचाही मृत्यू

तेहरान : अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या भीषण हवाई हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनी यांच्यानंतर आता त्यांच्या पत्नी मंसूरेह खोजस्तेह बाघेरजादेह यांचाही मृत्यू झाला आहे. शनिवारी झालेल्या या हल्ल्यात त्या अत्यंत गंभीर जखमी झाल्या होत्या. इराणची सरकारी वृत्तवाहिनी प्रेस टीव्हीने सोमवारी त्यांच्या निधनाची पुष्टी करत त्या शहीद झाल्याचे म्हटले आहे.

मन्सूरेह खोजस्तेह बागेरजादेह यांचा जन्म १९४७ साली मशहाद येथे एका पर्शियन धार्मिक कुटुंबात झाला. त्यांचे वडील मोहम्मद इस्माइल खोजस्तेह बागेरजादेह हे मशहादमधील एक प्रतिष्ठित व्यापारी होते. त्यांचे भाऊ हसन खोजस्तेह बागेरजादेह हे इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण ब्रॉडकास्टिंग (सेदा-ओ-सिमा) चे उपसंचालक म्हणून काम करत होते. मन्सूरेह खोजस्तेह बागेरजादेह यांची पहिली भेट १९६४ मध्ये एका खासगी समारंभात अयातुल्ला अली खामेनी यांच्याशी झाली.

यानंतर, १९६५ मध्ये त्यांचे अयातुल्ला खामेनेईं यांच्याशी लग्न झाले. त्यांना मुस्तफा, मोजतबा, मसूद, मेसम हे चार मुलगे आणि बोशरा व हुदा या दोन मुली आहेत. मोजतबा यांच्याकडे खामेनेईं यांचा उत्तराधिकारी म्हणून बघितले जात होते. मात्र सध्या अलीरेजा अराफी यांची लीडरशिप कौन्सिलमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page