गुन्हेगारीपुणे शहर

पुण्यात घरफोड्या करणारी सोलापुरी टोळी गजाआड

विश्रांतवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची धडक कामगिरी

पुणे : विश्रांतवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील ७ व हडपसर पोलीस स्टेशन हद्दीमधील १ असे ८ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यात विश्रांतवाडी पोलीस स्टेशनला यश आले आहे. चोरीचा माल विकत घेणाऱ्या सोनारासह ५ जणांना अटक करण्यात आली आहे.

१) पंचाक्षरी संगय्या स्वामी (वय ३५ रा. प्लॅट नं ७, हिलपार्क अपार्टमेंन्ट, मोदी मील जवळ, सोलापूर) २) नरेश विष्णू अच्चुगटला (वय ३३ रा. जुनी मिलचाळ मुरारजी पेठ, सोलापूर) ३) अंगद वाल्मीक बंडगर (वय ३०, रा. गंगानगर, जुना देवगाव नाका जगताप हॉस्पीटल जवळ, सोलापूर) ४) शावरसिध्द भरत पुजारी (वय ३५ रा. कुमठा नाका सोलापूर ५) कल्याणमा मलप्पा इंडी (वय ४९, रा. ८७६ पश्चिम मंगवार पेठ, सोलापूर ) अशी आरोपींची नावे आहेत.

पंचाक्षरी स्वामी याच्या कमरेस शर्टाच्या आतमध्ये एक लोखंडी कटावणी मिळून आली. पॅन्टच्या खिशामध्ये सोन्याचे गंठण, सोन्याची अंगठी, दोन जोड कानातीन रिंग असे दागिने मिळून आले. दागिने हडपसर येथे चोरी केल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांना दाखल गुन्हयात अटक करून तपासात आणखीन दोन आरोपींना अटक करण्यात आली.

पोलीस उप निरीक्षक लहु सातपुते व तपास पथकातील अंमलदार विश्रांतवाडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत होते .सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास भरत ढाब्याजवळ आले असता पोलीस अमलदार संपत भोसले व प्रफुल मोरे यांना माहिती मिळाली की मुंजाबा वस्ती येथे संशयीतरित्या तीन जण फिरताना दिसत आहेत. दोन टिम तयार करून विमान बिल्डींग गोकुळनगर येथे पाठविण्यात आल्या. तीन इसम समोरुन येताना दिसले. त्यांना थांबण्याचा इशारा केला असता ते पळून जात होते. त्यांना सातपुते व तपास पथकातील अंमलदार हवालदार दिपक चव्हाण, यशवंत किर्वे, संपत भोसले, संजय बादरे, संदिप देवकाते प्रफुल मोरे आणि शेखर खराडे यांनी ताब्यात घेतले.

त्यांना पळून जाण्याचे कारण विचारले असता ते उडवा उडवीची उत्तरे देवू लागले. त्यांचा घरफोडया, चोऱ्या करण्याचा संशय आल्याने नावे, पत्ते विचारले असता त्यांनी नावे सांगितली. त्यांच्याकडे केलेल्या तपासात अन्य दोघांची नावे समजली. त्यांनाही पकडण्यात आले. कल्याणप्पा मलप्पा इंडी हा सोनार असून त्याच्याकडून ७,४८,०० रुपयांचे २२.५ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले.

ही कारवाई रंजन कुमार शर्मा (अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग) शशिकांत बोराटे (पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ४) आरती बनसोडे (सहाय्यक पोलीस आयुक्त खडकी विभाग) तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय भापकर, गुन्हे निरिक्षक भालचंद्र ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page