राष्ट्रीय

केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळून ७ जणांचा मृत्यू

डेहराडून : उत्तराखंडच्या केदारनाथ धाममध्ये पुन्हा एकदा मोठी दुर्घटना घडली आहे. रविवारी केदारनाथ मार्गावर एक हेलिकॉप्टर कोसळले. हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह एकूण ७ जण असल्याची माहिती आहे. या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन कंपनीचे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले. ही दुर्घटना गौरीकुंड आणि त्रिजुगीनारायणदरम्यान घडली. हेलिकॉप्टर क्रॅश होण्याचे कारण खराब हवामान असल्याचे सांगितले जात आहे.

चारधाम यात्रेदरम्यान वेगवेगळ्या धामांवर हेलिकॉप्टर अनेक वेळा क्रॅश झाले आहेत. तसेच हेलिकॉप्टरचे अनेक वेळा आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. अलीकडेच रस्त्याच्या मधोमध हेलिकॉप्टरचे लँडिंग करण्यात आले. चारधाम यात्रेच्या सुरुवातीला एक हेलिकॉप्टर क्रॅश झाले, ज्यामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला.

हेलिकॉप्टरमध्ये एका लहान मुलासह ७ जणांचा मृत्यू झाला आहे. प्रवासी हे उत्तराखंड, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात राज्यातील होते. मृतांमध्ये महाराष्ट्रातील ३५ वर्षीय श्रद्धा राजकुमार जैसवाल आणि ४१ वर्षीय राजकुमार सुरेश जैसवाल यांच्यासह दोन वर्षीय काशी या मुलीचा समावेश आहे. तर विक्रम (उत्तराखंड), विनोद देवी (६६, उत्तर प्रदेश), तुस्थी सिंग (१९, उत्तर प्रदेश), कॅप. राजीवसिंग चौहान (पायलट) यांचाही समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page