राष्ट्रीयसामाजिक

केरळमध्ये २२ वर्षाच्या दलित विद्यार्थ्याचा इमारतीवरुन पडून मृत्यू

शिक्षकांनी जातीवरून अपमान केल्याचा आरोप

केरळ : केरळ राज्यात एका २२ वर्षाच्या, मेडिकल शाखेत शिकणाऱ्या दलित विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. महाविद्यालयातील शिक्षकांनी त्याच्या जातीवरून, रंगावरून आणि त्याचे आई वडील रोजंदारीवर काम करतात म्हणून त्याचा अपमान केल्याचा आरोप होत आहे.

थिरुवअनंतपुरममधील उझहामलाक्कल गावात राहणाऱ्या नितीन राजा आर.एल. याचा कन्नूर डेंटल कॉलेज कॅम्पमध्ये इमारतीवरून पडून मृत्यू झाला. बीडीएस च्या पहिल्या वर्षाला शिकणाऱ्या नितीनला लगेचच मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल केले गेले मात्र गंभीर जखम झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

कुटुंबीयांनी नितीनच्या मृत्यूप्रकरणी काहीतरी चुकीचे झाले असल्याचा आरोप केला आहे. कन्नूर पोलिसांनी या प्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे. मात्र रविवारी पोलिसांनी आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा अतिरिक्त गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी कॉलेजमधील दोन शिक्षकांवर ठपका ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, कन्नूर एसीपींच्या अध्यक्षतेखाली एक विशेष तपास पथक देखील तयार करण्यात आले आहे. यात प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की नितीनने एका ऑनलाईन अपमार्फत कर्ज घेतले होते. या कर्जपरतफेड प्रकरणी एजंट त्याला फोनवरून धमकी देत होते. तसेच तो एजंट हा कॉलेजमधील फॅकल्टी मेंबरच्या संपर्कात देखील होता. या प्रकरणी सायबर पोलिसांनी अजून एक गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा लोन अपच्या एजंटवर दाखल करण्यात आला आहे.

मॅनेजमेंटने याची दखल घेतली असून विभाग प्रमुख आणि असोसिएट प्रोफेसर यांच्यावर विद्यार्थ्यांचे जातीवरून अपमान केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या आरोपांची चौकशी करण्याचे देखील आदेश दिले आहेत.

दरम्यान, या प्रकरणातील एक ऑडिओ क्लिप बाहेर आली असून यात जातीवरून अपमान केल्याचा नितीन दावा करत आहे. त्यात शिक्षकांनी जातीवरून अपमान आणि छळ केल्याचा आरोपही त्याने केला आहे.

यात नितीन म्हणतो की, ‘ते माझा सर्वांसमोर अपमान करतात. मी खूप सहन केले आहे. माझी उत्तरपत्रिका वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना दाखवण्यात आली. माझे स्पेलिंग मिस्टेक सर्वांना दाखवण्यात आल्या.’ ‘परवा मी त्यांच्या क्लासमध्ये बसलो असताना त्यांनी माझ्या आईची देखील खिल्ली उडवली. स्टाफ रूममधून बाहेर आल्यानंतर त्यांनी मला इडियट म्हंटले. मी त्यांना सेम टू यू असे प्रत्युत्तर दिले. स्टाफ रूम ही अशी जागा आहे तिथे सर्वजण मिळून तुमच्यावर हल्ला करतात. जर मी ही गोष्ट बाहेर सांगितली तर तुझे हात आणि पाय तोडून टाकू अशी धमकी देखील त्यांनी दिली. मी त्यांना असे करण्याचे आव्हान दिले.’

नितीनच्या बहिणाने देखील त्याचा कसा छळ होत होता हे सांगितले असून त्या प्राध्यापकांवर कारवाई करण्याची मागणी तिने केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page