अकोला जिल्ह्यात पारा ४६.९ अंश सेल्सिअसवर

नागपूर: संपूर्ण विदर्भात उष्णतेने कहर केला असून उष्णतेची तीव्र लाट पसरली आहे. अकोला जिल्ह्यात सर्वाधिक, ४६.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. इतके प्रचंड तापमान ऐकून अन्य ठिकाणच्या नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
अमरावती जिल्ह्यात ४६.५ अंश सेल्सिअस ,भंडारा ४४.०अंश सेल्सिअस ,बुलडाणा ४३.५ अंश सेल्सिअस अशी परिस्थिती आहे. त्यामुळे विदर्भातील नागरिक दुपारी ऊन तीव्र होण्यापूर्वी आणि सूर्यास्त होण्यापूर्वी रस्त्यावर दिसत आहेत.
ब्रह्मपूर मध्ये ४४.२अंश सेल्सिअस
चंद्रपूर ४५.० अंश सेल्सिअस ,गडचिरोली ४४.५ अंश सेल्सिअस , गोंदिया ४४.४अंश सेल्सिअस नागपूर ४५.४ अंश सेल्सिअस आणि वर्धा जिल्ह्यात ४६.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद रविवारी झाली. या तीव्र उन्हाळ्यामुळे दिवसा आणि रात्री मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत असून अनेक नागरिकांना शारीरिक मानसिक अस्वस्थता जाणवत आहे.
यवतमाळ मध्ये ४६ अंश सेल्सिअस तर वाशिम मध्ये ४६.४ तापमान नोंदले गेले. यवतमाळ मध्ये ४६.० अंश सेल्सिअस तापमान होते.



