पुणे शहर

कॉपीराईट कायद्याचा भंग केल्याप्रकरणी हॉटेल बास्टीनवर गुन्हा दाखल 

पुणे: नोवेक्स कम्युनिकेशन कंपनीकडून अधिकृत परवाना न घेता कंपनीकडील झी म्युझिक, वायएसआर, टिप्स, सारेगमा या म्युझिकल इंडस्ट्रीयल कंपनीचे स्वामीत्व हक्क असलेल्या विविध चित्रपटातील गाणी डी जे साऊंड बॉक्स सिस्टिम वर वाजवून कॉपीराईट कायद्याचा भंग केल्याप्रकरणी हॉटेल बास्टीन हॉस्पिलिटी कंपनी व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्यात आला.

अधिकृत परवाना न घेता विविध कंपन्यांचे स्वामीत्व हक्क असलेली चित्रपट गीते डी जे वर वाजविल्याप्रकरणी नोवेक्स कम्युनिकेशन कंपनीचे एरिया मॅनेजर चेतन विरुळकर यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी हॉटेल बास्टीन हॉस्पिलिटी कंपनी व्यवस्थापन व इतर कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

१४ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री ९ ते १५ फेब्रुवारी २०२५ रोजी मध्यरात्री दीड वाजेपर्यंत तसेच २४ डिसेंबर रात्री साडेदहा ते २५ डिसेंबर २०२५ मध्यरात्री साडेबारा आणि ३१ डिसेंबर २०२५ रोजी रात्री साडेदहा ते १ जानेवारी २०२६ रोजी मध्यरात्री १ वाजेपर्यंत हॉटेल बास्टीन यांच्या व्यवस्थापनाने स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी नोवेक्स कम्युनिकेशन कंपनीकडून अधिकृत परवाना न घेता कंपनीकडील झी म्युझिक, वायएसआर, टिप्स, सारेगमा या म्युझिकल इंडस्ट्रीयल कंपनीचे स्वामीत्व हक्क असलेल्या विविध चित्रपटातील गाणी प्रदर्शित केली. पोलीस उपनिरीक्षक अजय कांबळे पाटील तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page