भाजपाच्या नगरसेविका अर्चना यांच्यावर ऍट्रॉसिटी नुसार गुन्हा दाखल

पुणेः भाजपाच्या नगरसेविका अर्चना पाटील आणि त्यांचे पती तषार पाटील यांच्यावर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (ऑट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पांडुरंग उर्फ बापू कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून खडक पोलीस ठाण्यात हा गन्हा नोंदवण्यात आला आहे.
प्रभाग २२मधील नगरसेविका अर्चना पाटील आणि मृणाल कांबळे यांच्यात अनेक दिवसांपासून अंतर्गत संघर्ष सुरू होता.
पाटील यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या प्रकरणात हस्तक्षेपाची मागणी केली आहे. पक्षांतर्गत अनेकदा तक्रारी करूनही न्याय न मिळाल्याने पोलिसांत धाव घ्यावी लागल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
मृणाल कांबळे यांनी अर्चना पाटील यांचे सर्व आरोप फेटाळले आहेत. पाटील प्रसिद्धीसाठी असे आरोप करीत आहेत. विकासकामांत अडथळे आणण्यासाठी आणि सहानुभूती मिळवण्यासाठी स्टंट सुरू आहे, असा आरोप कांबळे यांनी केला.
मृणाल कांबळे यांनी आपले ‘मॉर्फ’ केलेले ‘व्हिडिओ’ हे सोशल मीडियावर पसरवून जाणीवपूर्वक बदनामी केली. पोलिस आयुक्तांच्या बैठकीतील विधाने फिरवून ती त्यांच्या तोंडी घालण्यात आली,’ असा दावा अर्चना पाटील यांनी केला आहे.
दरम्यान, अर्चना पाटील आणि त्यांचे पती तुषार पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. येथील खडक पोलीस ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भाजपच्याच नगरसेविका मृणाल कांबळे यांचे भाऊ बापू कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
पुणे महापालिका निवडणुकीपासून पाटील आणि कांबळे कुटुंबांमध्ये राजकीय वाद आणि मतभेद सुरू होते. निवडणूक प्रचारावेळी पाटील दांपत्याने जातीय द्वेषातून निवडणूक कार्यालयावरील बॅनर काढणे, कांबळे यांच्या कार्यकर्त्यांना दमदाटी करणे, तसेच विजयानंतर त्यांच्या घरासमोर लावलेल्या बॅनरवरुनही वाद निर्माण केल्याचा आरोप बापू कांबळ यांनी दिलेल्या फिर्यादीतून करण्यात आला आहे. तसेच पाटील हे जाणीवपूर्वक एका विशिष्ट समाजाला लक्ष्य करत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. दरम्यान, याआधी भाजपच्या नगरसेविका अर्चना पाटील यांनी मृणाल कांबळे यांच्याविरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती.



