मुंबई

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डॉ. दुधभाते यांच्या ‘नेत्रकोष’चे प्रकाशन

डोळ्यांच्या आरोग्यावर सोप्या भाषेत मार्गदर्शन

मुंबई : पुण्यातील प्रख्यात नेत्ररोग तज्ञ डॉ. अनिल दुधभाते लिखित ‘नेत्रकोष’ या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रसन्न वातावरणात पार पडले. साध्या आणि सोप्या भाषेत लिहिलेल्या या पुस्तकाचे अवलोकन करताना मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.

या पुस्तकाला ज्येष्ठ नेत्ररोग तज्ञ डॉ. तात्याराव लहाने तसेच प्रसिद्ध ‘दीक्षित डाएट’ संकल्पनेचे जनक डॉ. जगन्नाथ दीक्षित यांची प्रस्तावना लाभली आहे.

‘नेत्रकोष’ या पुस्तकामध्ये डोळ्यांच्या विविध आजारांबाबत अत्यंत सोप्या आणि सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत माहिती देण्यात आली आहे. प्रत्येक आजाराचे कारण, तो टाळण्यासाठी घरच्या घरी करता येणाऱ्या उपाययोजना, तसेच आजार झाल्यास प्राथमिक पातळीवर कोणती काळजी घ्यावी आणि नेत्रतज्ञांचा सल्ला केव्हा घ्यावा, याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे.

डॉ. दुधभाते यांच्या सुमारे १५ वर्षांच्या अनुभवावर आधारित हे पुस्तक असून, विविध आजारांमधून बरे झालेल्या रुग्णांचे अनुभव आणि अभिप्रायही त्यांच्या स्वतःच्या भाषेत यात समाविष्ट करण्यात आले आहेत.

हे पुस्तक वाचक आणि रुग्णांसाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म Amazon वर उपलब्ध असून लवकरच विविध पुस्तक विक्री केंद्रांवरही उपलब्ध होणार आहे. तसेच सिंहगड रोड येथील डॉ. दुधभाते नेत्रालय व रेटिना सेंटरमध्येही हे पुस्तक मिळणार आहे.

या प्रकाशन सोहळ्यास आमदार अभिमन्यू पवार, प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, सौ. डिंपल दुधभाते, साहित्यिक गिरीश वसेकर, डॉ. स्नेहल मानपुत्र, तन्मय कारंजकर, कृष्णा सरवदे आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page