पुणे शहर

चिमुकलीशी लैंगिक गैरवर्तन करणाऱ्या आरोपीला तात्काळ बेड्या

२४ तासांच्या आत न्यायालयात दोषारोपपत्र 

पुणे: खाण्याचे अमिष दाखवून ६ वर्षांच्या चिमुकलीशी लैंगिक गैरवर्तन करणाऱ्या आरोपीला तात्काळ बेड्या ठोकून त्याच्याविरुध्द २४ तासांच्या आत लोणीकाळभोर पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

श्रीधर लिंबाजी कांबळे (वय ४६ वर्षे रा. भिमनगर थेऊर ता. हवेली) असे आरोपीचे नाव आहे. पीडितेच्या अल्पवयाचा गैर फायदा घेवून, ती खेळत असताना तिला खाण्याचे अमिष दाखवून, तिच्यासोबत लैंगिक गैरकृत्य केल्याबाबत मुलीच्या आईने तक्रार दाखल केली होती.

लोणी काळभोर पोलीसांनी तात्काळ घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करुन त्यास तात्काळ अटक केली. भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ७४ सह बालकाचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा २०१२ चे कलम ८, १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हयाचा जलदगतीने २४ तासांच्या आत संपूर्ण तपास पूर्ण करुन आरोपीस जलदगतीने शिक्षा होईल या उद्देशाने पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.

सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार मा. पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ- ६ सागर कवडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, लोणी काळभोर विभाग अनुराधा उदमले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंन्द्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक, (गुन्हे) स्मिता पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्नेहल राजे, यांच्या मार्गदशनाखाली करण्यात आली.

सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, पोलीस उप निरीक्षक पुजा माळी, पोलीस उप निरीक्षक रुपाली जाधव, पोलीस अंमलदार सागर जगदाळे, चेतन कुंभार यांनी सहभाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page