महाराष्ट्र

युवा नेते जय पवार यांच्या पहिल्याच जनता दरबाराला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जनतेच्या समस्या तात्काळ सोडवण्यावर दिला भर

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवानेते जय अजितदादा पवार यांनी गुरुवार पासून बारामती येथे जनता दरबाराची सुरुवात केली असून पहिल्याच जनता दरबाराला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र पहायला मिळाले.

दरम्यान जनतेच्या अडचणी, समस्या जाणून घेत जय पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ दूरध्वनीद्वारे सूचना देत अनेक प्रश्न जागेवरच मार्गी लावण्याचा प्रयत्न केला .

बारामतीतील जनतेच्या समस्या जलदगतीने सोडवण्यासाठी दर आठवड्याच्या प्रत्येक गुरुवारी जय अजितदादा पवार जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांना भेटणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page