महाराष्ट्रशैक्षणिकसामाजिक
मानकोसकर क्लिनिकचे रविवारी पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

पुणे : बावधन येथील अद्ययावत मानकोसकर क्लिनिकचे लोकार्पण पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते रविवार, दि. २५ जून २०२३ रोजी सकाळी दहा वाजता होणार आहे. लोहिया-जैन बिझनेस हबमध्ये हे क्लिनिक आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे.
मधुमेहतज्ज्ञ डॉ. अश्विनीकुमार एस. मानकोसकर, रेडिऑलॉजिस्ट डॉ. ऐश्वर्या ए. मानकोसकर यांनी हे क्लिनिक सुरू केले आहे. उद्घाटन कार्यक्रमाला आ. भीमराव तापकीर, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी नगरसेवक किरण दगडे पाटील, दिलीप वेडे पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
उद्घाटन सोहळ्याला उपस्थिती लावण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे. उद्घाटन कार्यक्रम सकाळी असला, तरी शुभेच्छा देण्यासाठी सकाळी दहा वाजल्यापासून स्नेहीजनांना येता येणार आहे.



