कृषीगुन्हेगारीसोलापूर

सोलापूर : डोक्यात फरशी घालून पतीकडून पत्नीची हत्या

सोलापूर : घरगुती वादातून नव-याने बायकोची निर्घृण हत्या केली आहे. पतीने पत्नीच्या डोक्यात फरशी घातली. नंतर मारहाणही केली. या हल्ल्यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना दक्षिण सोलापुरात घडली आहे. या घटनेची माहिती विजापूर पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत तपासणी करत पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

गौराबाई नीलकंठ पाटील असे मृत महिलेचे नाव आहे. तर, नीलकंठ भीमराव पाटील असे आरोपी पतीचे नाव आहे. हे जोडपे दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. गौराबाई आणि नीलकंठ यांना दोन विवाहित मुले आहेत. गेल्या काही दिवसांपासून, त्यांच्यात क्षुल्लक कारणावरून वाद सुरू होता.

‘तू शेतात न येणारी आज कशी आलीस’असा जाब विचारत पतीने पत्नीसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. दोघांमधील वाद विकोपाला गेला. रागाच्या भरात पतीने पत्नीच्या डोक्यात फरशी घातली. तसेच मारहाणही केली. या मारहाणीत पीडित महिला रक्तबंबाळ होऊन खाली कोसळली. यात तिचा जागीच मृत्यू झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page