Uncategorized

माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित पुण्यातील ९ ठिकाणी ईडीची छापेमारी

पुणे : गेल्या काही महिन्यांपासून ईडी हे नाव राजकीय नेत्यांसह सर्वसामान्यांसाठी देखील धडकी भरवणार ठरत आहे. अचानकपणे ईडीने पुण्यातील तब्बल नऊ ठिकाणी जोरदार छापेमारी केल्याचे वृत्त समोर आले आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीनुसार सकाळी पुण्यामध्ये ईडीने काही व्यावसायिकांसह व्यापाऱ्यांवर धाड टाकली आहे. पुण्यात टाकण्यात आलेल्या धाडीचे कनेक्शन राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्याशी असल्याची चर्चा आता सुरु झाली आहे. पुण्यातील तब्बल ९ व्यावसायिकांच्या घरी आणि ऑफिसेसवर छापेमारी ईडीने केल्याचे समजते. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता. पुण्यातील कोंढवा, कोरेगाव पार्क, सलीसबरी पार्क, नाना पेठ, भांडारकर रोड अशा ठिकाणी ईडीने छापेमारी केल्याचे समजते. मराठी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार विवेक गव्हाणे, चंद्रकांत गायकवाड, जयेश दुधेडिया या व्यवसायिकांच्या घरी आणि कार्यालयांवर ईडीची झडती घेतल्याचे समजते. सकाळी सकाळी ईडीने आपला मोर्चा थेट पुण्याच्या दिशेने वळवल्याने सर्वांकडूनच आश्चर्य व्यक्त केलं जातंय. ईडीने नेमकी ही छापेमारी कशासाठी केली याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे आता या छापेमारीनानंतर कोणत्या नेत्याच्या अडचणी वाढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page