गुन्हेगारीपुणे शहर

खुनानंतर २० महिन्यांपासून फरार आरोपी हडपसर पोलिसांकडून जेरबंद

पुणे : विनोद मधुकर शार्दुल (वय ४५, रा. दिवा ईस्ट ठाणे) याला उन्नतीनगर, हडपसर येथील कॅनॉलमध्ये ढकलून ठार करणारा २० महिन्यांपासून फरार आरोपी पोलिसांकडून उत्तराखंड मध्ये जेरबंद करण्यात आला. वैभव मनोज जाधव ( वय.२४ वर्षे रा. औरंगाबाद) असे त्याचे नाव आहे.

४ मे २०२४ रोजी उन्नतीनगर जवळील कॅनाल मध्ये एक जण बेशुद्ध अवस्थेत आढळून आला होता. परिसरातील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार त्यास तातडीने ससून सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यास मृत घोषित केले. पुढील चौकशीत सदर मृत इसमाचे नाव समजले.

शार्दुल व जाधव यांच्यात वाद झाला होता. या वादातून दोघांनी संगनमत करून शार्दुल यास कॅनॉलमध्ये ढकलून जिवे ठार मारल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्याबाबत हडपसर पोलीस स्टेशन मध्ये भा.दं.वि. कलम ३०२, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. घटनेनंतर आरोपी फरार झाले होते. अन्य आरोपीचा शोध सुरू आहे.

सदर गुन्ह्याच्या तपासासाठी, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर पोलीस स्टेशन संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार संदीप राठोड यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा शोध घेतला.

आरोपी वास्तव्यास असलेले लॉज निश्चित करण्यात आले. त्यानुसार पोलीस तपास पथकाने २५ डिसेंबर रोजी उत्तराखंड राज्यातील हरीद्वार येथे गेले. आरोपी हॉटेलबाहेर येताच तात्काळ कारवाई करत आरोपीस पकडण्यात आले.

सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ६, डॉ. सागर कवडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग अतुलकुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली, करण्यात आली.

गुन्हे निरिक्षक नीलेश जगदाळे, प्रभारी अधिकारी पोलीस उप निरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, अंमलदार दिपक कांबळे, भाऊसाहेब खटके, निलेश किरवे, बापु लोणकर, विजय कानेकर, अजित मदने, भगवान हंबर्डे, आकाश धावडे, तुकाराम झुंजार, महेश चव्हाण, कुंडलीक केसकर, महाविर लोंढे व अमोल जाधव यांनी कारवाईत सहभाग घेतला.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page