Uncategorized

फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर फुटबाॅल सामन्यादरम्यान दोन गटात जोरदार हाणामारी

पुणे : पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर फुटबॉल सामन्या दरम्यान हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना मारहाण केल्याप्रकरणी तेरा जणांविरुद्ध डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या संपूर्ण प्रकरणी अर्णव लोणकर, अभिषेक सिंग, सारंग डोनाडकर यांच्यासह तेरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रवींद्र परदेशी यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर फुटबॉल सामन्यातील उपांत्यफेरी सुरू होती. त्या वेळी चेंडूच्या ताब्यावरून वाद झाला. त्यानंतर वीरेंद्र परदेशी याच्या संघातील खेळाडूंना शिवीगाळ करण्यात आली. प्रतिस्पर्धी संघातील अकरा खेळाडू तसेच अर्णव लोणकर, अभिषेक सिंग, सारंग डोनाडकर यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे परदेशी याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांकडून या प्रकरणी तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page