Uncategorized

महाराष्ट्रात आता ३६ ऐवजी ५८ जिल्हे होणार? ‘हे’ २२ जिल्हे प्रस्तावित

मुंबई : राज्यात आता ३६ ऐवजी ५८ जिल्हे होऊ शकतात. कारण राज्यात आणखी २२ जिल्ह्यांची मागणी प्रस्तावित आहे. १ मे १९६० रोजी २७ जिल्ह्यांचं महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. अनेक जिल्हे हे लोकसंख्या आणि आकाराच्यादृष्टीने मोठे होते. मात्र प्रशासकीय कामासाटी नागरिकांची गैरसोय होऊ लागली. त्यानंतर आजपर्यंत राज्यात नवीन १० जिल्ह्यांची भर पडून ते ३६ जिल्हे झाले. मात्र अजूनही गावातून येणाऱ्या नागरिकाला जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी पूर्ण दिवस प्रवासात जातो. त्यामुळे आता आणखी २२ जिल्ह्यांची मागणी प्रस्तावित आहे.

राज्यात पहिल्यांदा २६ जिल्हे होते

ठाणे, कुलाबा (आताचे रायगड), रत्नागिरी, बृहन्मुंबई, नाशिक, धुळे, पुणे, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), बीड परभणी, उस्मानाबाद, नांदेड, बुलढाणा, अहमदनगर, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, जळगाव, भंडारा, चांदा ( आता चंद्रपूर) हे २६ जिल्हे नव्याने अस्तित्त्वात आलेल्या महाराष्ट्रात होते.

या १० जिल्ह्यांची भर

या जिल्ह्यातून हा जिल्हा तयार

◾रत्नागिरी – सिंधुदुर्ग (१ मे १९८१)

◾छत्रपती संभाजीनगर – जालना (१ मे १९८१)

◾धाराशिव – लातूर (१६ ऑगस्ट १९८२)

◾चंद्रपूर – गडचिरोली (२६ ऑगस्ट १९८२)

◾बृहन्मुंबई – मुंबई उपनगर (१ ऑक्टोबर १९९०)

◾अकोला – वाशिम ( १ जुलै १९९८)

◾धुळे – नंदुरबार ( १ जुलै १९९८)

◾परभणी – हिंगोली ( १ मे १९९९)

◾भंडारा – गोंदिया ( १ मे १९९९)

◾ठाणे – पालघर ( १ ऑगस्ट २०१४)

◾आणखी २२ जिल्हे प्रस्तावित आहेत ( २०१८ मध्ये स्थापना समितीचा प्रस्ताव)

या जिल्ह्यांतून हे नवीन जिल्हे तयार होण्याची शक्यता

 

◾नाशिक – मालेगाव, कळवण

◾पालघर – जव्हार

◾ठाणे – मीरा भाईंदर, कल्याण

◾अहमदनगर – शिर्डी, संगमनेर, श्रीरामपूर

◾पुणे – शिवनेरी

◾रायगड – महाड

◾सातारा – माणदेश

*रत्नागिरी – मानगड

◾बीड – अंबेजोगाई

◾लातूर – उदगीर

*नांदेड – किनवट

◾जळगाव – भुसावळ

◾बुलडाणा – खामगाव

*अमरावती – अचलपूर

◾यवतमाळ – पुसद

◾भंडारा – साकोली

◾चंद्रपूर – चिमूर

◾गडचिरोली – अहेरी

संपूर्ण राज्यात महाराष्ट्र दिन साजरा केला जात आहे. १ मे हा महाराष्ट्र दिन आणि कामगार दिवस म्हणूनही साजरा केला जातो. विशेष म्हमजे आज गुजरात दिवसही आहे. स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्याच्यानंतर काही काळ गुजरात आणि महाराष्ट्र दोन राज्य मुंबई प्रांताचे भाग होते. भाषावार प्रांतरचनेमुळे गुजरात आणि महाराष्ट्र या दोन वेगळ्या राज्याची घोषणा करण्यात आली. १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page