पंचतारांकित हॉटेलात सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा सामाजिक सुरक्षा पथकाकडून पर्दाफाश
तीन दलाल ताब्यात

पुणे : पुणे शहर गुन्हे शाखेचा सामाजिक सुरक्षा पथकाने दिल्ली, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल अशा ठिकाणांवरुन पिडीत महिलांना बोलावून ग्राहकांशी ऑनलाईन संपर्क करुन पुण्यातील पंचताराकीत हॉटेलात सेक्स रॅकेट चालवणाऱ्या टोळीवर कारवाई केली. परराज्यातील मुली / महिला यांना काही जण वॉट्सअॅप द्वारे संपर्क करुन जास्तीच्या पैशांचे अमिष दाखवून वेश्या व्यवसायासाठी पुणे शहरात बोलावून घेत. त्यांना वेश्या व्यवसासाठी भाग पाडत असत. याबाबत सामजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखा पुणे शहर येथील पोलीस अंमलदार तुषार भिवरकर व अमित जमदाडे यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानंतर अशा एजंट व्यक्तींची गोपनीय माहीती काढून सामाजिक सुरक्षा विभागाकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी 1 मे रोजी सापळा रचला. बनावट ग्राहका पाठवून वेश्या गमनासाठी मुलीबाबत विचारणा केली. एजंटने पुणे स्टेशन परीसरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये दोन रूम बुक करण्यास सांगितल्या. दोन मुली हॉटेल मधील बनावट ग्राहक थांबलेल्या रूम मध्ये आल्यानंतर अचानक छापा टाकण्यात आला. दोन मुलींना ताब्यात घेवून विचारपूस केली असता त्यांच्याप्रमाणेच आणखी दोन मुली एजंटसह येरवडा परीसरात असल्याची माहिती मिळाली. लागलीच तांत्रिक विश्लेषणाद्वारे माहिती प्राप्त करून, महाराष्ट्र हौसिंग सोसायटी येरवडा येथून दोन पिडीत मुली व तीन एजंट मिळून आले. त्यांना ताब्यात घेवून तीन आरोपीं विरूध्द बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे गुरनं. १२६/ २०२३ भादंवि कलम ३७०, ३४ सह अनैतिक मानवी चाहतुक प्रतिबंधक अधिनियम कायदा कलम ३,४,५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. चार पिडीत मुलींची सुटका करण्यात आली आहे. पुढील तपास बंडगार्डन पोलीस स्टेशनचे अधिकारी करीत आहेत. ही कारवाई पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह आयुक्त, पुणे शहर संदिप कर्णिक, अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील, व अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार, राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, अजय राणे, तुषार भिवरकर, मनिषा पुकाळे, इम्रान नदाफ, इरफान पठाण,अमित जमदाडे, ओंकार कुंभार यांच्या पथकाने यशस्वी केली.




