गुन्हेगारी

पुणे शहर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक-२ कडून १४,००,००० किंमतीचा ७० ग्रॅम ‘एमडी’ पदार्थ जप्त

पुणे : संगमवाडी येथे एमडी हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी आलेल्या अली शेर लालमोहमद सौदागर (वय ६१ रा पंकज शिंदे चाळ संगमवाडी) याला गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक २ ने रविवारी पकडले. १४,००,००० किंमतीचा ७० ग्रॅम एमडी हा अंमली पदार्थ व मोबाईल फोन व वजन काटा असा एकूण १४,०४००० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे , उप निरीक्षक दिगंबर चव्हाण, तसेच अंमली पदार्थ विरोधी पथक-२ चा स्टाफ येरवडा पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार नितीन जगदाळे यांना माहिती मिळाली की एक जण एमडी हा अंमली पदार्थ विकण्यासाठी येणार आहे. छापा कारवाई केली. सौदागर विरुद्ध येरवडा पोलीस स्टेशन येथे एनडीपीएस अॅक्ट कलम ८(क) २१(क) प्रमाणे गुन्हा नोंद झाला. ही कामगिरी रामनाथ पोकळे अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे), अमोल झेंडे पोलीस उप आयुक्त (गुन्हे ), नारायण शिरगावकर (सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे २) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील थोपटे, फौजदार चव्हाण, अंमलदार रविंद्र रोकडे, चेतन गायकवाड, योगेश मांढरे, नितीन जगदाळे, प्रशांत बोमदंडी, अझीम शेख, संदीप जाधव, महेश साळुंखे, दिशा खेवलकर यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page