आंतरराष्ट्रीय

मकाऊमध्ये तिरंगा फडकला! ११ व्या सँडा वर्ल्ड कपमध्ये अपर्णा दहिया ठरली ‘गोल्डन गर्ल’

मकाऊ : मकाऊ येथे सुरू असलेल्या ११ व्या सँडा वर्ल्ड कपमध्ये भारतीय वूशू खेळाडू अपर्णा दहिया हिने चमकदार कामगिरी करत महिलांच्या ५२ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले आहे. अपर्णाने अंतिम फेरीत जागतिक विजेत्या खेळाडूचा पराभव करत भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

काल पार पडलेल्या अत्यंत चुरशीच्या अंतिम सामन्यात अपर्णाने व्हिएतनामच्या विद्यमान विश्वविजेत्या थी फुओंग न्गा न्गो (Thi Phuong Nga Ngo) हिचा सरळ सेटमध्ये पराभव केला. सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत अपर्णाने प्रतिस्पर्ध्याला सावरण्याची संधी दिली नाही आणि एकतर्फी विजय नोंदवला.

भारताचे स्पर्धेतील पहिले सुवर्ण

१२ मे पासून सुरू झालेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील भारताचे हे पहिले सुवर्णपदक ठरले आहे. जागतिक स्तरावरील अव्वल खेळाडूंचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत अपर्णाने दाखवलेले कौशल्य आणि संयम वाखणण्याजोगा होता.

तिच्या या यशाबद्दल देशभरातून आणि क्रीडा क्षेत्रातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. या विजयामुळे भारतीय वूशू खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी प्रेरणा मिळाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page