अल्काराझची हॅट्टिट्रक हुकली, यानिक सिनरने पटकावले विम्बल्डन जेतेपद

लंडन : विम्बल्डन २०२५ स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात अग्रमानांकित यानिक सिनर याने इतिहास रचत दोनवेळच्या चॅम्पियन कार्लोस अल्कराझला पराभूत केले आणि इटालियन टेनिस स्टारने पहिल्यांदाच विम्बल्डन स्पर्धा जिंकली.
या आधी पाचवेळा अल्कराझ आणि सिनर यांच्यात सामना झाला. ज्यात अल्काराझ भारी ठरला. पण विम्बल्डनच्या फायनलमध्ये पहिला सेट गमावल्यानंतर दमदार कमबॅक करीत इटालियन खेळाडू सिनरने विम्बल्डन स्पर्धेत नवा इतिहास रचला. त्याने दोन वेळा विजेत्या कार्लोस अल्काराझला ४-६, ६-४, ६-४, ६-४ अशा निकालाने पराभूत करून पहिल्यांदाच विम्बल्डनचा खिताब जिंकला.
२३ वर्षांच्या सिनरने १९६८ पासून सेंटर कोर्टवर ट्रॉफी उंचावणारा २३ वा खेळाडू होण्याचा मान मिळविला. यापूर्वी फ्रेंच ओपनच्या अंतिम सामन्यातही अल्काराझने सिनरला ५ तास २९ मिनिटांच्या थरारक सामन्यात हरवले होते. अल्काराझचे सलग तिस-यांदा विम्बल्डन स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न धुळीस मिळाले.



