आंतरराष्ट्रीय

इराणने ५ लाखांहून अधिक अफगाणी नागरिकांना काढले देशाबाहेर

तेहरान : संयुक्त राष्ट्रांची एजन्सी ‘आयओएम’नुसार, गेल्या २४ जून ते ९ जुलै दरम्यान तब्बल ५,०८,४२६ अफगाण नागरिकांनी इराण-अफगाणिस्तान सीमा ओलांडली आहे. यांपैकी बहुतेक लोक हे, गेल्या अनेक वर्षांपासून इराणमध्ये राहत असलेले, कागदपत्रे नसलेले कामगार होते. हे पाऊल, मार्च २०२५ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या इराणी हद्दपारी धोरणांतर्गत उचलण्यात आले आहे.

इराण आणि इस्रायल यांच्यात १२ दिवस चाललेला संघर्ष नुकताच संपुष्टात आल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे, काही अफगाण नागरिकांनी इस्रायलसाठी हेरगिरी केल्याचा दावा येथील स्थानिक सरकारी माध्यमांनी केला आहे.

इस्लाम काला बॉर्डर क्रॉसिंग (पश्चिम अफगाणिस्तान) वरून आलेल्या व्हिडिओमध्ये परतणा-या हजारो अफगाणांची गर्दी दिसून आली आहे. मदत केंद्रे पूर्णपणे भरली आहेत आणि अनेक मुले त्यांच्या पालकांशिवाय आली आहेत. ‘आयओएम’च्या मिशन प्रमुख मिहयोंग पार्क यांनी दिलेल्या माहितीनुसार, हजारों लोक उन्हात उभे आहेत आणि हेरातमधील उष्णता अत्यंत तीव्र असते.

महत्वाचे म्हणजे, गेल्या आठवड्यात आमच्याकडे सुमारे ४०० मुले आले आहेत, जे आपल्या कुटुंबांपासून वेगळे झाले आहेत. ही फार मोठी संख्या आहे. तसेच, जुलैच्या पहिल्या आठवड्यातच २.५ लाख अफगाण नागरिकांना हद्दपार करण्यात आले आहे, जो २०२५ मधील सर्वात मोठा साप्ताहिक आकडा आहे, असेही त्या म्हणाल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page