आंतरराष्ट्रीयराष्ट्रीय

अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या

वॉशिंग्टन : अमेरिकेमध्ये पुन्हा एकदा एका भारतीय नागरिकाची हत्या करण्यात आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार मूळ हैदराबादचा रहिवासी असलेल्या एका विद्यार्थ्यावर अमेरिकेत गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. अमेरिकेच्या डलासमध्ये एका पेट्रोल पंपावर हा विद्यार्थी काम करत होता. याचदरम्यान या विद्यार्थ्यावर गोळीबार करण्यात आला. या घटनेत त्याचा मृत्यू झाला. चंद्रशेखर पोल असे या विद्यार्थ्याचे नाव आहे, या घटनेने खळबळ उडाली आहे.

चंद्रशेखर पोल हा हैदराबादवरून अमेरिकेत बॅचलर ऑफ डेंटल सर्जरीचे शिक्षण घेण्यासाठी २०२३ मध्ये गेला होता. त्याने नुकतीच अमेरिकेमध्ये आपली मास्टर डिग्री पूर्ण केली होती. तसेच तो अमेरिकेच्या डलासमध्ये एका पेट्रोल पंपावर पार्ट टाईम जॉबदेखील करत होता, पार्ट टाईम काम करताना तिथे पूर्ण वेळ नोकरीचा त्याचा शोध सुरू होता. याचदरम्यान ही घटना घडली. पेट्रोल पंपावर काम करत असताना त्याच्यावर गोळीबार करण्यात आला, या घटनेत त्याचा मृत्यू झाला.

जेव्हा ही घटना घडली तेव्हा चंद्रशेखर पोल यांची नाईट शिफ्ट होती. नाईट शिफ्टदरम्यान काम सुरू असताना एका अज्ञात व्यक्तीने पोल यांच्यावर गोळीबार केला, या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. ही घटना नेमकी कशी घडली, का घडली, याबाबत आणखी कोणतीही माहिती समोर आलेली नाही, तेथील पोलिस यंत्रणा घटनेचा तपास करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page