वाहनचालकांना मोठा दिलासा, टोलमध्ये मोठी कपात

नवी दिल्ली : केंद्र सरकारे फास्टटॅग बंधनकारक केल्याने टोलनाक्यावरून प्रवास करताना वाहनांच्या रांगा कमी झाल्या आहेत. तसेच टोल प्लाझावरील व्यवहारातही गती आली आहे. मात्र, अद्यापही अनेक वाहनधारक फास्टटॅगचा वापर करत नाहीत. त्यामुळे सरकारने फास्टटॅग न वापरणा-या वाहनधारकांना दुप्पट टोल आकारणी सुरू केली. मात्र, आता ऑनलाईन पेमेंट करणा-या वाहनधारकांना दुप्पट पेमेंटपासून मुक्ती मिळणार आहे. तांत्रिक व्यवहार वाढविणे आणि यूपीआय पेमेंटला प्रमोट करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे.
सध्याच्या नियमानुसार फास्टॅगऐवजी रोख किंवा यूपीआयने टोल भरणा-या वाहनधारकांना सध्या टोल रकमेच्या दुप्पट टोल द्यावा लागत आहे. मात्र, १५ नोव्हेंबरपासून केंद्र सरकारने या नियमांत बदल केला असून वाहनधारकांना मोठा दिलासा दिला. नव्या नियमानुसार यूपीआय म्हणजे ऑनलाईन पेमेंटच्या माध्यमातून टोल भरणा-या वाहनधारकांना फक्त २५ टक्के जास्त टोल भरावा लागणार आहे. आता दुप्पट टोल वसूल केला जातो. १५ नोव्हेंबरपासून ही सवलत मिळणार आहे. राष्ट्रीय महामार्गावरून गाड्या चालवणा-या वाहनधारकांना यूपीएने पेंमेंट केल्यास दिलासा मिळणार आहे.
नितीन गडकरी यांच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने २००८ मधील नियमात बदल केले आहेत. त्यानुसार वाहनधारकांनी रोखीत पैसे दिल्यास त्यांना टोल टॅक्सच्या दुप्पट रक्कम भरावी लागत आहे. पण जर यूपीआय किंवा अन्य मार्गाने डिजिटल पेमेंट केल्यास हाच टॅक्स सव्वापट असेल. फास्टॅग नसलेल्या वाहनांसाठी ही मोठी सूट आहे.
१५ नोव्हेंबरपासून नवीन नियम लागू
डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी आणि टोल नाक्यावर रोखीत होणारे व्यवहार करण्यासाठी नवा नियम करण्यात आलेला आहे. यामुळे टोल नाक्यावर होणा-या पेमेंटच्या पद्धतीत मोठा बदल अपेक्षित आहे. १५ नोव्हेंबरपासून नवा नियम अंमलात येईल.



