नवी दिल्ली

शर्टलेस आंदोलन करणाऱ्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना जामीन 

एआय परिषदेत शर्टलेस आंदोलन प्रकरण घोषणा भडकाऊ नव्हत्या : न्यायालय

नवी दिल्ली : दिल्लीतील कोर्टाने एआय समिटमध्ये शर्ट काढून आंदोलन केल्याप्रकरणी अटक केलेल्या इंडियन यूथ काँग्रेसच्या ९ कार्यकर्त्यांना सोमवारी जामीन मंजूर केला आहे. कोर्टाने म्हटले की, हे आंदोलन केवळ सरकारवर टीका करण्याचा एक मार्ग होता. त्यामुळे खटला सुरू होण्यापूर्वी कोणालाही तुरुंगात ठेवणे कायद्याच्या मूलभूत तत्त्वांच्या विरोधात असेल.

कोर्टाने आपल्या निर्णयात म्हटले की, आंदोलनादरम्यान लावण्यात आलेले नारे भडकाऊ नव्हते. त्यांना कोणताही धार्मिक किंवा प्रादेशिक रंग नव्हता. कोणत्याही प्रकारची तोडफोड किंवा लोकांना घाबरवल्याचा कोणताही पुरावा मिळाला नाही. कोर्टाने हे देखील सांगितले की, आंदोलनकर्त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले होते. कोर्टाने म्हटले स्वातंत्र्य हा अधिकार आहे आणि तुरुंगवास केवळ विशेष परिस्थितीतच असावा. जर खटल्यापूर्वी कोणालाही आवश्यक कारणाशिवाय तुरुंगात ठेवले गेले, तर ते शिक्षा निश्चित न करताच शिक्षा दिल्यासारखे होईल.

न्यायिक दंडाधिकारी (प्रथम वर्ग) रवी यांनी कृष्ण हरी, नरसिंह यादव, कुंदन कुमार यादव, अजय कुमार सिंह, जितेंद्र सिंह यादव, राजा गुर्जर, अजय कुमार विमल उर्फ बंटू, सौरभ सिंह आणि अरबाज खान यांच्या जामीन अर्जांवर सुनावणी केल्यानंतर हा आदेश पारित केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page