विदर्भ-मराठवाडा भागात भूकंपाचे सौम्य धक्के

छत्रपती संभाजी नगर: भूकंपप्रवण क्षेत्र मानल्या जाणाऱ्या विदर्भ-मराठवाडा भागात भूकंपाचे सौम्य धक्के अधूनमधून जाणवत असतात. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि कोणतीही अफवा पसरवू नये असे आवाहन केले आहे.
महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाडा भागात शनिवारी सकाळी ८ वाजून ४५ मिनिटांनीभूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. सुदैवाने या सौम्य भूकंपामुळे कोठेही जीवित किंवा वित्तीय नुकसान झाले नाही. भीतीने नागरिक घराबाहेर पडल्याचे सांगितले जात आहे. मात्र, नंतर परिस्थिती सुरळीत झाली.
वाशिम शहरातील काही भागांबरोबरच यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील शेबाळपिंपरी परिसरात आणि नांदेड शहर व परिसरात हे हलके धक्के बसले.
भूकंपाच्या वेळी भूगर्भातून मोठा आवाज आला आणि त्यानंतर जमीन हलल्यासारखे जाणवले. नांदेडमध्ये हा धक्का ८ वाजून ४६ मिनिटांनी जाणवला. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यात शेबाळपिंपरी भागात ८ वाजून ४५ मिनिटाने भूकंपाचे धक्के जाणावले.
नांदेड शहर व परिसर
नांदेड शहर आणि आसपासच्या परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का ८ वाजून ४६ मिनिटांनी जाणवला.
राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र (NCS) कडून अद्याप अधिकृत मॅग्निट्यूड आणि केंद्रबिंदूची माहिती समोर आलेली नाही. मात्र, स्थानिक नागरिकांच्या अनुभवांनुसार हा धक्का अतिशय हलका होता.



