मुंबईसामाजिक

गेट आऊट’ म्हणत राजकीय मोर्चेकऱ्यांना सुनावणाऱ्या महिलेविरोधात झेन सदावर्तेची तक्रार 

मुंबई: ‘गेट आऊट’ म्हणत राजकीय मोर्चेकऱ्यांना सुनावणाऱ्या महिलेविरोधात गुणरत्न सदावर्ते यांची कन्या झेन सदावर्ते हिने या महिलेविरोधात वरळी पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दिली आहे.

मुंबईतील जांभोरी मैदान परिसरात नारी वंदन विधेयक नामंजूर झाल्याविरोधात भाजपने जनआक्रोश मोर्चा काढला. त्यामुळे काही काळ वाहतूक खोळंबली. त्याचा संताप एका महिलेने व्यक्त केला. महाजन यांनी हे प्रकरण सामोपचाराने मिटवले. त्यांनी सर्वांनाच शांत केले आणि तिथून ते मोर्चा स्थळाकडे निघाले.

या महिलेच्या संतापावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.

या मोर्च्यासाठी रीतसर परवानगी घेण्यात आली होती. पण हमरस्त्यावर त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. त्यात एका महिलेचा मुलगाही अडकला. त्यामुळे ती महिला संतप्त झाली.

संबंधित महिला तिच्या मर्सिडीजमधून उतरून मोर्चात व्यत्यय आणत होती. ती मोर्चेकरांना असभ्य भाषेत बोलत होती. शट अप, डोन्ट टॉक टू मी, गेट आऊट हे अपमानजनक शब्दांचा वापर करत होती. आपण वरळी पोलीस ठाण्यात याविषयी तक्रार दाखल केली आहे. सदर महिलेविरोधात पोलिसांनी कारवाई करावी अशी विनंती आपण केल्याचे झेन सदावर्ते हिने स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page