मुंबई

मीरा बोरवणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड? 

मुंबई: रुपाली चाकणकर यांच्या मुळे वादग्रस्त झालेल्या महिला आयोगाची प्रतिमा आता सुधारणार आहे. निवृत्त आयपीएस पोलीस अधिकारी मीरा चढ्ढा- बोरवणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याची जोरदार चर्चा सोमवारी सुरु होती.

बोरवणकर यांनी पुणे शहरासह विविध जिल्ह्यांत लक्षणीय कामगिरी केली. कुख्यात अतिरेकी महंमद अजमल कसाब याला फाशी देण्यात आली तेव्हा त्या कारागृह महानिरीक्षक होत्या. अतिशय कर्तव्य दक्ष आणि स्वच्छ प्रतिमा असलेल्या अधिकारी म्हणून त्या प्रसिद्ध आहेत. त्यांनी गैरप्रकार करणाऱ्या राजकारण्यांचा सुध्दा भांडाफोड केला आहे.

दरम्यान, बोरवणकर यांनी आपल्याला अधिकृत विचारणा झाली नसल्याचे सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page