राष्ट्रीय

आव्हानात्मक प्रवास पार करत मालवाहू जहाज ‘सिमी’ भारतात; कांडला बंदरात २० हजार टन LPG ची डिलिव्हरीP

कांडला (गुजरात) : आंतरराष्ट्रीय सागरी मार्गावरील आव्हानांचा यशस्वी सामना करत, ‘मार्शल आयलंड्स’चा ध्वज असलेले ‘सिमी’ (Symi) हे अजस्त्र मालवाहू जहाज अखेर भारताच्या कांडला बंदरात सुरक्षितपणे दाखल झाले आहे. या जहाजातून तब्बल २०,००0 टन द्रवीकृत पेट्रोलियम गॅस (LPG) भारतात आणला गेला आहे. ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने हा पुरवठा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

२०,००0 टन LPG मुळे देशांतर्गत इंधनाची मागणी पूर्ण करण्यास मोठी मदत होणार असून तणावाच्या वातावरणातही भारताचा सागरी व्यापार आणि ऊर्जा पुरवठा साखळी (Supply Chain) विस्कळीत झाली नसल्याचे या यशस्वी प्रवासावरून स्पष्ट झाले आहे.

जागतिक व्यापारासाठी अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ‘होर्मुजच्या सामुद्रधुनीतून’ (Strait of Hormuz) या जहाजाने १३ मे रोजी यशस्वीपणे प्रवास केला होता. सध्या या सागरी क्षेत्रात असलेल्या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर, या टँकरचा प्रवास आणि त्याचे भारतात सुरक्षित पोहोचणे याकडे व्यापारी वर्गाचे बारीक लक्ष होते.

कांडला बंदरात जहाज पोहोचताच प्रशासनाकडून गॅस उतरवण्याची (Unloading) प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या यशस्वी मोहिमेमुळे भारतीय ऊर्जा क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page